पुणे महापालिकेचे नगरसेवक विजय शेवाळे यांचे निधन
पुणे : पुणे महानगरपालिकेचे भारतीय जनता पार्टीचे औंध- बोपोडी प्रभागाचे नगरसेवक विजयराव बाबुराव शेवाळे यांचे मंगळवारी रोजी अल्पशा आजाराने दुःख निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी बुधवारी रोजी दुपारी बोपोडी स्मशानभूमी येथे झाला.
औंध प्रभाग समिती अध्यक्ष, विधी समिती, क्रीडा समिती अशा महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी, पत्नी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. विजय शेवाळे हे माजी महापौर सुरेश शेवाळे यांचे धाकटे बंधू होते.
यांच्या निधनाने बोपोडी भागात हळहळ व्यक्त केली जात आहे.
