Sunday, May 31, 2026
PUNE

स्वयँप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने १०० टन धान्यवाटपातून दान उत्सव

पुणे : स्वयँप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे महाराष्ट्रातील ५४ संस्थांना मिळून १०० टन गहू धान्यवाटप करुन दान उत्सव साजरा करण्यात आला. समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये अनाथाश्रम, ग्रामीण विकास करणा-या संस्था, वृद्धाश्रम, दृष्टीहिन मुलांना स्वत:च्या पायावर उभ्या करणा-या संस्था, गतिमंद मुलांना सांभाळणा-या संस्था, गायींचे संगोपन करणाºया संस्था, वनवासी भागात काम करणा-या अनेक संस्थांमध्ये धान्याचे वाटप करण्यात आले. उपक्रमाचे यंदा ५ वे वर्ष होते.

 
ट्रस्टचे मुख्य विश्वस्त डॉ. सुनील शशिकांत काळे यांच्या वाढदिवसानिमित्त हा दान उत्सव दरवर्षी केला जातो. यावर्षी पुण्यासह, बारामती, मुळशी, बीड, नळदुर्ग, सोलापूर, तळेगाव, नारायणपूर, अमरावती, अहमदनगर, वाघोली, राजगुरुनगर, पंढरपूर, आळंदी, वडगाव, पुरंदर, चाकण, जुन्नर, सातारा, जळगाव, जामखेड या भागांतील सामाजिक संस्थांना धान्य देण्यात आले आहे. 
व्यवसायाने डॉक्टर असेलेले सुनील काळे, मागील १२ वर्ष समाजातील वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना सहज समजेल अशा भाषेत प्रबोधन करीत आहेत. आयुष्य कसे जगावे, आपली संस्कृती विज्ञानाशी कशी जोडलेली आहे, हे अध्यात्माची विज्ञानाशी सांगड घालत समाज प्रबोधन करत आहेत.  संगीताच्या माध्यमातून परमतत्त्वाची उकल अगदी सोप्या भाषेत ते करतात. मुंबई, पुणे, बदलापूर, सांगली, कोल्हापूर, कराड, नाशिक, अमरावती, लातूर, जळगांव अशा अनेक ठिकाणी त्यांची ९०० हून अधिक विवेचने संपन्न झाली आहेत.  


‘ हे विश्वम्भरा, समस्त विश्वाचे कल्याण कर ! ‘  अशी प्रार्थना आपण परमेश्वराकडे करतो. मात्र, आपल्यावर समाजाचं अनंत ऋण आहे. समाजासाठी अनेक संस्था प्रामाणिकपणे खूप मोलाचे कार्य करत असतात, त्यांना जरी आपण त्यांच्या कार्यात मदत करू शकलो तर यासारखे दुसरे मोठे कार्य नाही, असे मत गहूदान करताना डॉ. सुनील काळे यांनी व्यक्त केले.
याच विचारधारेतून २०१२ साली स्वयँप्रकाशी चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या अंतर्गत धान्यदान, वस्त्रदान, दुग्धदान, ज्ञानदान असे अनेक उपक्रम राबवले जातात.
समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रांत गरजू लोकांना खंबीर आधार आणि बळ देणा-या संस्थांशी संपर्क साधून दर वर्षी अन्नदान करण्याचा आणि त्याला जनता जनार्दनाकडून आणि संस्थांकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद म्हणून या वर्षाच्या उपक्रमाला  महामारीच्या काळात टाळेबंदी असूनही इतकं मोठं यश मिळणं ही आपल्या सगळ्यांसाठीच आनंदाची गोष्ट आहे, असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading