भारत बंद – पुण्यात संभाजी ब्रिगेड पदाधिकाऱ्यां चा आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी…
पुणे – मोदी सरकार शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याच्या मार्गावर आहे. शेतकरी विरोधी कायदे करून ‘अदानी-अंबानी’ या भांडवलदारांच्या हातात देश देण्याच्या हालचाली सुरू आहेत. घरात भाजली जाणारी ‘भाकरी’ उद्या पिझ्झा मागवल्या सारखी ‘ऑनलाईन’ अदानी-अंबानीच्या कंपनीकडून मागवावी लागेल. म्हणून आम्हांला विरोध करावा लागेल. शेतीमाल विक्री कायदा 2020 बऱ्याच कालावधीपासुन शेतकरी त्यांच्या मालाला आधारभुत किंमत मिळावी म्हणून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु करा म्हणत असताना शेतीमाल विक्री कायदा लागु करून कृषी उत्पन्न बाजार समीतीचे खच्चीकरण करूण भांडवलशाही व्यवस्था निर्माण करण्याचा घाट घातला जात आहे. तो तात्काळ थांबला पाहिजे व शेतकरी विरोधी शेतीमाल विक्री कायदा 2020, कंत्राटी शेती कायदा 2020, अत्यावश्यक वस्तु कायदा हे कायदे रद्द करावे, स्वाभिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, शेतकरी आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजेत… म्हणून संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र’च्या वतीने भारत बंद पाठींबा आहे असे संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी सांगितले.
