टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेसतर्फे उद्योगांसाठी सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्स उपलब्ध
पुणे, दि. ५ – टाटा टेलि बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) ही भारतातील उद्योगांसाठी कनेक्टिव्हिटी आणि कोलॅबोरेशन सोल्यूशन पुरविणारी अग्रगण्य कंपनी आहे. टीटीबीएस कंपनीतर्फे लघु व मध्यम उद्योगांसाठी एन्टरप्राईज-ग्रेड स्मार्ट सायबर सिक्युरिटी सोल्यूशनची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
क्लाउड कन्टेन्ट सिक्युरिटी प्लॅटफाॅर्म (सीसीएसपी) यावर आधारित इमेल सिक्युरिटी, वेब सिक्युरिटी, नेक्स्ट जनरेशन फायरवाॅल, एन्डपाॅइंट सिक्युरिटी आणि मल्टिफॅक्टर आॅथेन्टीफिकेशन (एमएफए) या सेवा लघु व मध्यम उद्योगांना कंपनी पुरवित आहे. त्यामुळे लघु व मध्यम उद्योगांना परिपूर्ण, प्रगत आणि अद्ययावत अशा सायबर सिक्युरिटी सोल्यूशनचा पर्याय उपलब्ध झाला असून अत्यंत वाजवी दरात, सोप्या पद्धतीने आणि त्यांना आवश्यक असलेल्या प्रमाणात तो अंमलात आणता येणार आहे.
टीटीबीएस सायबर सिक्युरिटी सोल्यूशन्सबाबत माहिती देताना मन्नू सिंग, उपाध्यक्ष, टाटा टेलिसर्व्हिसेस लिमिटेड म्हणाले, वाजवी दरामध्ये आणि सक्षमपणे सायबर क्षेत्रातील धोक्यांपासून उद्योगांना वाचविण्यासाठी जागतिक दर्जाच्या प्लॅटफाॅर्म आधारित सिक्युरिटी पोर्टफोलियोच्या माध्यमातून उद्योगांना एन्टरप्राईज-ग्रेड सास सिक्युरिटी सेवा टाटा टेलि सर्व्हिसेस उपलब्ध करून देत आहे. कोव्हिड-महामारीनंतर उद्योग विश्वात बहुतांश कंपन्यांनी डिजिटायझेशनकडे झेप घेतली आहे. शिक्षण, ई-काॅमर्स, वर्क फ्राॅम होम सुविधा कशाप्रकारे वाढत आहेत आणि त्यातील नावीन्यपूर्ण पद्धती आपण अनुभवत आहोतच.
नवीन डिजिटल नाॅर्मलचा स्वीकार करताना, रॅन्समवेअर किंवा फिशिंग वा अन्य सायबर धोक्यांपासून वाचण्यासाठी उद्योगांना सज्ज राहावे लागणार आहे. सायबर हल्ले आणि गुन्हे करणारे पूर्वीपेक्षा अधिक तरबेज झाले आहे. त्यामुळे आपल्या व्यवसायावर कोणताही आर्थिक वा अन्य नकारात्मक परिणाम होऊ देणे तसेच महत्त्वाचा संवेदनशील डेटा गमावणे हे उद्योगांना आता परवडणारे नाही. टीटीबीएसकडून देण्यात येत असलेल्या प्रगत सायबर सुरक्षा सेवेमध्ये मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. फोर्टिनेट, ट्रेंड मायक्रो, पालो अल्टो नेटवर्क्स आणि सिस्को यासारख्या सायबर सुरक्षा क्षेत्रातील अग्रगण्य कंपन्यांच्या सेवा टीटीबीएसच्या सेवेमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक आणि खासगी क्लाउड बिझनेस अॅप्लिकेशन्सचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रदीर्घ कार्यक्षमतेसह सायबर सुरिक्षतता पुरविण्यात येते. बीएफएसआय, आयटी, आयटीईएस, मॅन्युफॅक्चरिंग, हेल्थकेअर, फिनटेक, एडटेक आदी क्षेत्रातील उद्योगांना बाजारातील सर्वोत्तम असे सायबर सुरक्षिततेशी संबंधित सेवा टीटीबीएसतर्फे २४ बाय ७ उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोव्हिड महामारीपश्चात उद्योग विश्वात सायबर सुरक्षिततेला चालना मिळाली आहे. सायबर सुरक्षिततेशी संबंधित सेवांमध्ये गुंतवणूक करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे या नवीन घडामोडींना आपण कसे स्वीकारू त्यावर उद्योगांचे यश अवलंबून असणार आहे. अभेद्य आणि सक्षम अशी सायबर सुरक्षितता ही महामारी-पश्चात काळात उद्योगांसाठी आधारभूत ठरणार आहे,
