T -20 भारताचा ऑस्ट्रेलियावर विजय
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात शुक्रवारपासून (४ डिसेंबर) ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील मनुका ओव्हल स्टेडियमवर होत असलेल्या पहिल्या टी२० सामन्यात भारताचा विजय झाला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद १६१ धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाला १६२ धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला २० षटकात ७ बाद १५० धावाच करता आल्या.
शॉर्टने टी नटराजनच्या गोलंदाजीवर दिशेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा हार्दिकने त्याचा झेल घेतला. यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजनने मिशेल स्टार्कला त्रिफळाचीत केले. भारताकडून गोलंदाजीत टी नटराजन आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने १ विकेट घेतली.
