गरजूंना मोफत अन्नदान सेवा
पुणे : समाजातील गरजूंना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने शिवाजी उद्यान ( सणस मैदान ) येथे ‘मोफत अन्नदान सेवा ‘ हा उपक्रम आयोजित करण्यात आला. धर्म गर्जना प्रतिष्ठानच्या या उपक्रमात गुरुवारी सायंकाळी शिवम मांजरे या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान सेवा करण्यात आली. यावेळी जगत्पिता प्रतिष्ठानचे संस्थापक सिध्दार्थ ( डिंक्या ) मांजरे, सुमीत पवार, शुभम शिंदे, विशाल क्षीरसागर, नागेश भोसले,धर्म गर्जना प्रतिष्ठानचे विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे, राकेश क्षीरसागर, शेखर बाले उपस्थित होते.
