‘अंक नाद ‘ चे निर्माते मंदार नामजोशी यांचा सन्मान ‘
पुणे : गणिताची गोडी लावण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या ‘अंकनाद ‘ या ऍप चे निर्माते आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा लि चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार नामजोशी यांचा पुणे पोस्ट विभागातर्फे सत्कार करण्यात आला. शिवाजीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात मंदार नामजोशी तसेच चित्रकार अश्विनी पद्माकर देशपांडे,राध्यायनी देवतळे यांच्यावरील स्टॅम्प चे प्रकाशन करण्यात आले. ‘अंकनाद ‘ हे ऍप ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट विभाग सहकार्य करेल अशी ग्वाही यावेळी देण्यात आली. निर्मिती नामजोशी ,समीर बापट यावेळी उपस्थित होते.
