डिजिटल सिंगिंग सेन्सेशन्स- फरमान आणि फरमानी आले इंडियन आयडल २०२० मध्ये
सर्व गायक भावंडांपैकी सनसनाटी जोडी असलेले फरमान आणि फरमानी हे इंडियन आयडल २०२० मध्ये त्यांच्या बहारदार सादरीकरणाद्वारे स्टेजवर ‘मौसम’ बदलायला तयार आहेत. सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने प्रतिकुल परिस्थितीत ताकतीने उभ्या राहणाऱ्या ताज्या दमाच्या गायकांना मंचावर आणले आहे. ऑडिशन राउंडदरम्यान अशाच एका जोडीने परीक्षकांचे लक्ष वेधले. ती जोडी म्हणजे मुझफ्फरनगर- उत्तर प्रदेश येथील फरमान आणि फरमानी. ती डिजिटल सेन्सेशनल जोडी असून ‘फरमान आणि फरमानी भावंड’ म्हणून लोकप्रिय आहेत. युट्यूब सिंगिंग व्हिडिओवर त्यांना लाखो व्ह्यू आहेत. तसेच स्वत:चे नावही कमावत आहेत.
या जोडीने रंगमंचावर हजेरी लावली, तेव्हा जज विशाल दादलानी यांनी त्यांना लगेच ओळखले. “ ओह माय गॉड, तुम्ही तर प्रसिद्ध भावंड आहात. खरं तर मी नुकताच तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. तुम्हा दोघांना इथे पाहून मला खूपच आनंद झाला. तुम्ही येथे येण्यात इंडियन आयडलचेही भाग्य आहे. ” फरमान आणि फरमानी, इंडियन आयडल २०२० मध्ये निवड झाल्यावर अभिमानाने म्हणाले, “ आजच्या दिवसापर्यंत आम्ही खूप संघर्ष केला आहे. या आयकॉनिक प्लॅटफॉर्मचा भाग बनताना आम्ही खूप उत्साही आहोत. ”
त्यांचे आवाज स्टेजवर गर्जत असताना जज खूपच प्रभावित झाले. ते म्हणाले, “ इंडियन आयडल २०२० या व्यासपीठावर भारतातील उत्कृष्ट प्रतिभेचे प्रतिनिधीत्व केले जाते. तुम्ही त्यापैकी एक आहात, खूप खूप शुभेच्छा!”
फरमानी आणि फरमान हे दोघेही खूप आनंदी होते. ते म्हणाले, “ आमच्या संगीतावरून आमची नेहमीच गावात खिल्ली उडवली गेली. पण त्याच संगीताद्वारे आम्ही त्यांना उत्तर दिले. ”
दैनंदिन कामे करत ही जोडी एवढे मनोरंजक आणि सुमधूर संगीत व्हिडिओ कसे बनवतात, हा व्हिडिओ पहाणे प्रेरणादायी आहे.
