पुणे मेट्रो – ५०% वेळेची बचत करत टेक्ला सॉफ्टवेअर डिजाईन करत आहे मंगळवार पेठ स्टेशन
पुणे, दि. १ – पुणे मेट्रोचे मंगळवार पेठ स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर या स्टेशनला “मावळा पगडी” लुक देण्यात येणार आहे, ज्याचे संपूर्ण श्रेय टेक्ला सॉफ्टवेअरचा वापर करून प्रगत स्ट्रक्चरल डिजाईन बनविणाऱ्या, जगातील आघाडीचे कॉन्स्ट्रक्टेबल बीआयएम सॉफ्टवेयरला जाते. टेक्ला स्ट्रक्चर्स हे ग्लोबल कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी लीडर ट्रिम्बल (एनएएसडीएक्यू:टीआरएमबी) चे फ्लॅगशिप कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेयर आहे.
मंगळवार पेठ हे पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी मार्गावरील सात उन्नत स्थानकांपैकी एक आहे. या मार्गावरील सर्व स्थानकांना शहराची सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अद्वितीय आणि आयकॉनिक स्वरूप देण्यात येणार आहे. “मावळा पगडीच्या’ प्रेरणेने मंगळवार पेठ मेट्रो स्टेशन डिजाईन करण्यात आले होते, पगडीचा एक प्रकार जो सन्मानाचे प्रतीक आहे आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे.
कोविड-१९ महामारी तसेच लॉकडाऊनच्या दरम्यान पुणे स्थित टेलजी प्रोजेक्टस प्रायवेट लिमिटेडला मेट्रो स्टेशनला स्टील स्ट्रक्चर मध्ये डिजाईन आणि बनविण्यासाठी पुरस्कृत करण्यात आले होते. कमी मुदतीवर काम करत कंपनीने टेक्लाच्या क्लाऊड-आधारित सहयोग साधनांचा फायदा घेतला आणि केवळ २० दिवसांत हा प्रोजेक्ट पूर्ण केला ज्यामध्ये फक्त २ अभियंता कार्य करीत होते. केंद्र सरकारने देशातील सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी बीआयएमला आदेश दिले आहेत, आणि स्ट्रक्चरची गुंतागुंत लक्षात घेत अचूक आणि रचनात्मक मॉडेलसाठी आम्ही केवळ टेक्लावर विश्वास ठेवू शकतो, असे श्री. व्रजेश लाड,टीम लीडर, टेलजी प्रोजेक्ट म्हणाले.
मावळा पगडी डिजाईन चे अचूक अनुकरण करतांना डिजाईन आणि इंजिनियरिंग टीमला कठीण काम पार पडावे लागले. ज्या वेळी टेलजी प्रोजेक्ट टीमने या प्रोजेक्टचे काम सुरु केले तेव्हा या प्रोजेक्ट्चे बांधकाम सुरु होते आणि इतर टीमने आधीच काम सुरु केले होते ज्यामुळे टेलजी टीमला इतर भागधारकांसह सहकार्य करीत काम करावे लागले. या प्रोजेक्टचे काम इतर टीमद्वारे आधीच सुरु झाले होते त्यामुळे अशा प्रोजेक्टवर काम करणे अधिकच आव्हानात्मक होते.
एका अभूतपूर्व जागतिक महामारीमध्ये सुरु झालेल्या लॉकडाऊनच्या दरम्यान टेलजी प्रोजेक्ट समोर या असाईनमेंटची अंमलबजावणी करणे हे सगळ्यात मोठे आवाहन होते. सुरु झालेल्या प्रोजेक्टवर काम करणे हा टेलजी टीमचा पहिलाच अनुभव होता. कोणतीही पूर्वतयारी न करता, टेलजी प्रोजेक्टला हा प्रकल्प उपलब्ध मर्यादित संसाधनांसह आणि अत्यंत कमी वेळेत अचूकपणे पूर्ण करावा लागला. टेक्ला मॉडेल शेअरींगमुळेच आम्हीच आमच्या ऑफिसमधून कार्यक्षमतेने कार्य करणे चालू ठेवू शकलो असे श्री. लाड म्हणाले.
उत्कृष्ट डिजाईन आणि इंजीनियरिंग कौशल्याची मागणी करत अत्यंत कमी मुदतीवर आणि जागतिक महामारी आणि लॉकडाऊनमध्ये मध्ये असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वीरीत्या राबविण्यात आला असे, पॉल वॉलेट,रिजनल डायरेक्टर, ट्रीम्बल सोल्युशन, इंडिया अँड मिडल ईस्ट म्हणाले. आम्ही सहमत आहो कि टेक्ला स्ट्रक्चर्सने विश्वासार्ह बीआयएम सोल्यूशन म्हणून पुन्हा त्यांचे कौशल्य सिद्ध केले आहे जे कोणत्याही सक्षम टीमसाठी कोणतीही डिजाईन बनवू शकतात. मग ते कुडोस असो किंवा टेलज असो टेक्लाने असे अनेक उत्कृष्ट प्रोजेक्ट पार पडले आहे.
