Monday, June 15, 2026
PUNE

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ऑनलाइन कवि संमेलनातून महात्मा फुले यांना अभिवादन   

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अक्षरभारती पुणे यांच्या संयुक्त  विद्यमाने महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्त महात्मा फुले अभिवादन ऑनलाईन कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी डॉ. विजय चोरमारे होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख  कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, डॉ. अविनाश सांगोलेकर, डॉ. रुपाली अवचरे यावेळी उपस्थित होते. या कविसंमेलनात दुर्गेश सोनार (मुंबई), प्रा. प्रदीप पाटील (इस्लामपूर),  बंडा जोशी, दीपक करंदीकर, वि. दा. पिंगळे, डॉ. संजय बोरुडे (अहमदनगर), विजय वडवेराव (शिवणे), प्रदीप गांधलीकर (चिंचवड), सोपान खुडे (मोशी), कमलेश गोसावी (मालवण , जि.सिंधुदुर्ग), किशोर कविटकर (नेरळ, नवी मुंबई),  कमल सोनजे (भोसरी), नयन रणदिवे, गणेश पुंडे (धनेगाव,जि. लातूर) आणि प्रताप पाटील (कोल्हापूर) हे कवी सहभागी झाले होते. डॉ. अविनाश सांगोलेकर यांनी स्वागत केले. प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रुपाली अवचरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. धनंजय भिसे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading