बाफ्ता ब्रेकथ्रू इंडियासाठी अर्जप्रक्रिया सुरू; ए. आर. रेहमान अॅम्बेसेडर
पुणे – ब्रिटिश अकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्टस् (बाफ्ता) ने आज घोषणा केली की नेटफ्लिक्सचे पाठबळ असलेल्या बाफ्ता ब्रेकथ्रू इंडियासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. हा उपक्रम जागतिक स्तरावरील, तसेच भारतासह , यूके, अमेरिका व चीनमधील चित्रपट, गेम्स व टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्जनशील प्रतिभेच्या भावी पिढीला प्रकाशझोतात आणण्यासोबत त्यांना पाठिंबा देतो.
बाफ्ताने आज बाफ्ता ब्रेकथ्रू इंडिया २०२०-२१ साठी अॅम्बेसेडर म्हणून ए. आर. रेहमान यांच्या नियुक्तीची देखील घोषणा केली. रेहमान यांच्यासोबतचा हा सहयोग यूके व भारतादरम्यानच्या सर्जनशील संबंधांच्या सातत्यपूर्ण विकासाला दाखवतो तसेच जागतिक स्तरावरील विविध प्रांतांमध्ये सादर करण्यासाठी भारतीय अविश्वसनीय प्रतिभांना देखील दाखवतो.
संगीतकार आणि बाफ्ता ब्रेकथ्रू अॅम्बेसेडर ए. आर. रेहमान म्हणाले, चित्रपट, गेम्स व टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये सादर करण्याकरिता भारतामध्ये असलेल्या अभूतपूर्व प्रतिभांचा शोध घेण्यासाठी मला बाफ्तासोबत सहयोगाने काम करण्याचा आनंद होत आहे. उदयोन्मुख कलाकारांसाठी ही एक अद्वितीय संधी आहे. यामधून त्यांना जगभरातील इतर प्रतिभावान सर्जनशील व्यक्तींशी संलग्न होण्यासाठी जगप्रसिद्ध संस्थांचे पाठबळ मिळेल, तसेच बाफ्ता विजेते व नामांकनांकडून मार्गदर्शन देखील मिळेल. मी जागतिक स्तरावर सादर करण्यासाठी भारतभरातून निवडण्यात येणारे सर्वोत्तम प्रतिभावान पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहे.
आम्हाला पहिल्यांदाच भारतामध्ये ब्रेकथ्रू अर्जप्रक्रिया सुरू करण्याचा खूप आनंद होत आहे, असे बाफ्ताच्या मुख्य कार्यकारी अमांडा बेरी ओबीई म्हणाल्या. ”मी आमचे प्रतिभावान अॅम्बेसेडर ए. आर. रेहमान यांच्या बहुमूल्य पाठिंब्यासाठी आभार मानते. ते त्यांच्या सर्जनशील कार्यासंदर्भातील क्षेत्रामध्ये अग्रणी आहेत आणि त्यांच्यामध्ये आमच्यासारखीच नवीन प्रतिभांचा शोध घेत त्यांना मार्गदर्शन करण्याची आवड आहे. त्यांना हिंदी, तमिळ व तेलुगु चित्रपटांमधील त्यांच्या अविरत कार्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे, ज्यामुळे ते या उपक्रमासाठी अत्यंत योग्य आहेत. यामुळे बाफ्ताला क्षेत्रातील व्यापक विभागाला आवाहन करण्यामध्ये मदत होईल.
बाफ्ता ब्रेकथ्रू इंडियाचा भाग म्हणून ब्रिटीश व भारतीय उद्योगक्षेत्रातील तज्ञ परीक्षक वर्षभर चालणा-या मेंटोरिंग व मार्गदर्शन उपक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी भारतभरातील पाच प्रतिभांची निवड करतील. निवडण्यात आलेल्या सहभागींना वन-टू-वन मेंटॉरिंग, जागतिक नेटवर्किंग संधी, १२ महिन्यांच्या कालावाधीत बाफ्ताच्या समारंभांमध्ये तसेच स्क्रीनिंग्जसाठी मुक्त प्रवेश तसेच बाफ्ता सदस्यत्वासाठी पूर्ण मतदानाचे हक्क आदी सुविधा दिल्या जातील. यामुळे निवड झालेल्या प्रतिभावंतांना यूके व भारतातील सर्जनशील उद्योगांमधील सर्वोत्तम व्यक्तींशी जोडून घेण्याची, त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळेल, त्यांचे कौशल्य जगभरातील समतुल्य प्रतिभावंतांपुढे सादर करता येईल, भौगोलिक सीमांपलीकडील संधींचा लाभ घेता येईल आणि जागतिक स्तरावर त्यांचे बाफ्ता ब्रेकथ्रू कलाकार म्हणून प्रमोशन करण्यात येईल.
जागतिक स्तरावर मे २०२० मध्ये सादर करण्यात आलेला हा उपक्रम पहिल्यांदाच यूके, अमेरिका, भारत व चीनमधील जागतिक स्तरावरील प्रतिभांना प्रशंसित करत आहे. नेटफ्लिक्स हा यूके, अमेरिका व भारतातील बाफ्ता ब्रेकथ्रूचा अधिकृत सपोर्टिंग पार्टनर आहे. जागतिक विस्तारात नेटफ्लिक्स अत्यावश्यक सहाय्य पुरवत आहे. जगभरातील उगवत्या प्रतिभेचा गौरव करून संधी पुरवणे, जागतिक नेटवर्क्समधील आंतरराष्ट्रीय समुदायांना एकत्र आणणे ही काही सामाईक उद्दिष्टे बाफ्ता व नेटफ्लिक्स यांच्यापुढे आहेत. विविध संस्कृतींमधील कथने व मते विकसित करणे तसेच त्यांना पाठिंबा देणे हे यामागील व्यापक उद्दिष्ट आहे.
अर्जप्रक्रिया
३० नोव्हेंबर २०२० पासून बाफ्ता भारतीय चित्रपट, गेम्स किंवा टेलिव्हिजन क्षेत्रांमध्ये उत्साहवर्धक न्यू परफॉर्मर, लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, छायाचित्रकार, गेम्स दिग्दर्शक, गेम निर्माता किंवा गेम डेव्हलपर म्हणून स्वत:चे नावलौकिक करण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या भारतभरातील महत्त्वाकांक्षी उमेदवारांना www.bafta.org/supporting-talent/breakthrough/bafta-breakthrough-india या वेबसाइटवर अर्ज सादर करण्याचे आवाहन करत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत सोमवार २५ जानेवारी २०२१ आहे.
पात्रतेसाठी अर्जदाराचे वय अर्ज सादर करण्याच्या वेळी १८ वर्षांहून अधिक असले पाहिजे, किमान २ वर्षांपासून भारताचा प्रमुख निवासी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे. चित्रपट, गेम्स व टेलिव्हिजनमधील विभिन्न सांस्कृतिक संवादाला प्रोत्साहित करण्याच्या मनसुब्यासह हा उपक्रम अशा उमेदवारांचा शोध घेत आहे, जे यूके व्यवसायींसोबत सहयोग करण्यासाठी, तसेच त्यांचे कौशल्य शेअर करण्यासाठी आणि/किंवा यूके प्रेक्षकांसाठी कन्टेन्ट निर्माण करण्यासाठी उत्सुक आहेत.
अर्जदारांनी संबंधित प्रादेशिक चित्रपट, गेम्स किंवा टेलिव्हिजन क्षेत्रातील संस्थेकडून शिफारस, तसेच खालील बाबींसंदर्भात कलाकृतीचे अग्रगण्य व्यावसायिकाकडून करण्यात आलेल्या प्रशंसेसंदर्भातील माहिती सादर करणे देखील आवश्यक आहे.
· भारतामध्ये रंगभूमीवर सादरीकरण;
· किंवा भारतातील टेलिव्हिजन चॅनेल किंवा ओटीटी व्यासपीठावर प्रसारण
·भारतामध्ये सादर केलेले आणि प्रेक्षकांना पाहता येण्याजोगे
· फोटोग्राफी www.bafta.thirdlight.com येथे उपलब्ध आहे.
