Friday, September 4, 2026
MAHARASHTRATOP NEWS

पवार कुटुंबात कलह सुरू? पुस्तकातील दाव्याने राज्यात खळबळ

मुंबई – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ पवारांवर टीका केली होती. त्यामुळे पवार कुटुंबात कलह सुरू असल्याचं समोर आलं होतं. आता असाच खुलासा एका पुस्तकातही करण्यात आला आहे. प्रियम गंधी यांनी लिहिलेलं ‘ट्रेडिंग पावर’ या पुस्तकात पवार कुटुंबात ऑल इज नॉट वेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे पुस्तक सध्या प्रकाशनाच्या मार्गावर आहे. पार्थ पवारांना डावललं जातंय आणि रोहित पवारांचं बळ वाढवलं जातं आहे असं या पुस्तकात म्हटलं गेलं आहे.

पवार कुटुंबात वाद म्हणावेत असे नाहीत. पण पक्षावर कुणाची कमांड राहिली पाहिजे या मुद्द्यावरुन पवार कुटुंबात सारं आलेबल आहे असंही म्हणता येणार नाही. पार्थ पवारांना ज्या पद्धतीने पाठबळ मिळायला हवं होतं तसं मिळालेलं नाही. त्यामुळे पवार कुटुंबात वाद नसले तरीही सारं काही आलबेल आहे असंच अधोरेखित होतं आहे असं प्रियम गांधी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितलं.

राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीची जवळीक वाढू लागली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीच्या एका नेत्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी या नेत्याने अजित पवार तुमच्यासोबत सत्ता स्थापन करू शकतात. त्यांचा शिवसेनेसोबत आघाडी करण्यास विरोध आहे, असं फडणवीसांना सांगितलं. त्यासाठी या नेत्याने शिवसेनेसोबत जाण्यास अजितदादा इच्छुक नाहीत, सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजितदादांचं शीतयुद्ध आहे, तसेच अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना डावललं जात असून रोहित पवारांना बळ दिलं जात आहे. त्यामुळेही अजितदादा नाराज असल्याचं या नेत्याने फडणवीस यांना सांगितल्याचा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading