भाजप’सह सगळ्या पदवीधर उमेदवारांना ‘संभाजी ब्रिगेड’ कात्रजचा घाट दाखवणार – संतोष शिंदे

पुणे, दि. 21 – पदवीधर निवडणूक आणि पदविधर मतदारसंघ राजकीय नेत्यांचा ‘पुनर्वसन’ कार्यक्रम नाही. पदवीधरांचे नेतृत्व तरुणांनी करावं. मात्र आजपर्यंत सुशिक्षित पदवीधर तरुणांची दिशाभूल करून सगळ्या पक्षांनी घराणेशाहीचा पुनर्वसनाचा कार्यक्रम राबवला. संभाजी ब्रिगेड हा पुनर्वसनाचा कार्यक्रम उद्ध्वस्त करून राजकीय ‘स्पेस’ निर्माण करणार आहे. पदवीधरांच्या हक्कासाठी आजपर्यंत कुठलाही निवडून आलेला उमेदवार बोलला नाही, तो फक्त राजकीय सेटलमेंट करून स्वतःची दुकानदारी चालवत राहिला. आम्हाला आमच्या हक्काचा उमेदवार पाहिजे. पदवीधर हा वयस्कर लोकांचा पुनर्वसन प्रोग्राम नाही तर पदवीधरांचे नेतृत्व करणारा तरुण सुशिक्षित उमेदवार पाहिजे. म्हणून संभाजी ब्रिगेडने तरूण इंजि. मनोज कुमार गायकवाड यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.

” चंद्रकांत पाटील यांनी पदवीधर आमदार म्हणून पुणे मतदार संघाचे नेतृत्व केलं. मात्र पदवीधरांचा आमदार म्हणून कधीही पुण्यासह इतर जिल्ह्यात पाय ठेवला नाही, ते पक्षाचे नेते व मंत्री म्हणून मिरवले, त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडवला नाही. म्हणून चंद्रकांत पाटील यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाही. मतदार म्हणून मला असल्या आमदाराची लाज वाटते. असे मत संभाजी ब्रिगेडचे माजी पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.

भाजप, राष्ट्रवादी व इतर राजकीय पक्ष हे भांडवलदारांचे दलाल आहेत. डुप्लिकेट आणि बेगडी माणसं आमचं खोटं नाव वापरून जगत आहेत. निवडणुकीत मतांची भीक मागत आहेत. हे खोटारडे आणि डुप्लिकेट माणसांना पदवीधर निवडणुकीत आम्ही कात्रजचा घाट दाखवणार आहे. आणि मंत्रालयावर पदवीधरांचा पहिला ‘झेंडा’ संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून फडकवणार आहोत. डुप्लिकेट आणि बेगडी लोकांचं पानिपत होणार हे नक्की असे शिंदे यांनी सांगितले.

संभाजी ब्रिगेड हे १००% समाजकारण व १००% राजकारण ही भूमिका घेत शिव- फुले- शाहू- आंबेडकर या कृतिशील विचारांनी चालणारे पक्ष-संघटन आहे. पुणे-सोलापूर येथील तरुण उद्योजक इंजि. मनोज कुमार गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थी प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने झालीत. एका तरुण उद्योजकाला संधी देण्याच्या उद्दिष्टाने व बहुजन विचारधारा जनमानसात रुजविणे च्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडचे उमेदवारी इंजि. मनोजकुमार गायकवाड यांना देण्यात आली आहे. तरी पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ही विचारधारा रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेड ला सहकार्य करावे ही विनंती.

Leave a Reply

%d bloggers like this: