गणेशयाग आणि मंत्रपठणाच्या गजरात ‘दगडूशेठ गणपती’ मंदिर खुले

पुणे : महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यास पाडव्यापासून परवानगी दिल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर शासनाची सर्व नियमावली पाळून भाविकांसाठी खुले करण्यात आले. गणेशयाग व मंत्रपठणाचा गजर देखील  मंदिरात करण्यात आला. भाविकांसाठी दर्शनरांगेत सोशल डिस्टन्सिंगची सुविधा, सॅनिटायझर व सर्व आरोग्यविषयक काळजी घेण्यात आली. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे शासनाच्या निर्णयाचे देखील स्वागत करण्यात आले. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते श्रीं ची आरती देखील करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने यांसह विश्वस्त व पदाधिकारी उपस्थित होते. दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणरायाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. 
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, शासनाने घालून दिलेले सर्व नियम पाळून भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. भाविकांनी घातलेला मास्क, सॅनिटायझेशन व्यवस्था व सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र, पहिल्या टप्प्यात भाविकांना मंदिराच्या सभामंडपात बसण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. शासनाने दिलेल्या निर्णयामुळे भक्तांचा पाडवा गोड झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: