‘लागिरं झालं जी’ मालिकेतील ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे निधन

बंगळुरू – ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री कमल ठोके यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. लागिरं झालं जीमध्ये त्यांनी जीजीची भूमिका वठविली होती. काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर बंगळुरू येथे उपचार सुरू होते. याच ठिकाणी शनिवारी सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ऐन दिवाळीत त्यांचं निधन झाल्याने मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे. कमल ठोके यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, मुलगी असा परिवार आहे.

कमल ठोके यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळात अभिनय क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. त्यांनी मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. सासर माहेर, सख्खा भाऊ पक्का वैरी, कुंकू झालं वैरी, भरला मळवट, बरड अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या भूमिका होत्या. लागिरं झालं जी या मालिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. जिजी या नावानेच त्या परिचितही झाल्या होत्या. देवमाणूस या मालिकेतही त्या काम करत होत्या. कराड येथील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: