Thursday, June 18, 2026
Sports

धोनी सोडणार चेन्नईचे कर्णधारपद

मुंबई – आयपीएलच्या 13 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली. पहिल्यांदाच महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईला प्ले ऑफमध्येही स्थान मिळविता आले नाही. धोनीने निराशाजनक कामगिरीनंतरही पुढील आयपीएल खेळणार असल्याचे संकेत दिले आहे. परंतु टीम मॅनेजमेंट आता कर्णधार पदासाठी नवीन पर्यायाच्या शोधात आहे. या मोसमात यशस्वी ठरलेला फलंदाज फाफ डु प्लेसिसकडे पुढील सीजनसाठी नेतृत्व सोपविण्याची शक्‍यता आहे.

याबाबत भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, आयपीएलच्या पुढील हंगामात धोनी चेन्नईचे नेतृत्व इतर खेळाडूंकडे सोपवू शकतो. भारतीय संघात असताना धोनीने ज्याप्रमाणे केले त्याचप्रमाणे पुढील वर्षी आपली जबाबदारी दुसऱ्या खेळाडूंवर सोपवू शकतो.

धोनीने 2011 नंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदावर राहायचे की नाही हा विचार केला असेल. धोनीला माहीत होते की भारतीय संघासमोर मोठ्या अडचणी होत्या. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात जाऊन खेळायचे होते.

शिवाय त्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधारपदासाठी कोणीही दावेदार नव्हते. त्यामुळेचं पुढील काही वर्षे धोनीने भारतीय संघाचे नेतृत्व केले आणि योग्य वेळी विराट कोहलीकडे संघाची धुरा सोपवली. त्यानंतर धोनी खेळाडू म्हणून खेळत राहिला, असे बांगर म्हणाले.

माझ्या मते, धोनी पुढील वर्षी नेतृत्व करण्याची शक्‍यता कमीच आहे. धोनी फक्‍त खेळाडू म्हणून संघात राहील. पुढील हंगामात धोनी संघाची कमान फाफ डु प्लेसिसकडे सोपवू शकतो. कारण सध्या त्यांच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असे बांगर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading