Thursday, June 18, 2026
NATIONALTOP NEWS

बिहारमध्ये पुन्हा नितीश कुमार, सोमवारी होणार शपथविधी

नवी दिल्ली, दि. 15 – बिहारचे नवे मुख्यमंत्री कोण, या प्रश्नाचं उत्तर आता मिळालंय. नितीश कुमार हेच नवे मुख्यमंत्री असणार आहेत. एनडीएच्या बैठकीत या बाबीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. नितीश कुमार आज राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. सोमवारी नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधीनंतर सलग चौथ्यांदा बिहारचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा विक्रम त्यांच्या नावे जमा होणार आहे.

बिहारची राजधानी पाटणामध्ये रविवारी एनडीएची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

नुकत्याच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला यश मिळालं असलं तरी जेडीयूच्या कामगिरीत कमालीची घसरण झाली होती. जेडीयूला केवळ ४३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर भाजपनं ७४ जागांवर विजय मिळवत आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळे आता नितीश कुमार यांची लोकप्रियता कमी होत असून जनमत त्यांच्याविरोधात असल्याची चर्चा सुरू झाली होती.

अशा परिस्थितीत भाजप मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगणार का, या चर्चेनंही जोर धरला होता. मात्र भाजपनं पुन्हा नितीश कुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा आपला शब्द पाळल्याचं आजच्या घडामोडींवरून स्पष्ट दिसतंय. पाटणामध्ये झालेल्या एनडीएच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading