जि. प. CEO आयुष प्रसाद “पुण्याचे आयकॉन” पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि. 12 – राउंड टेबल इंडिया ही गैर राजनैतिक व सांप्रदायिक तत्वावर कार्य करणाऱ्या तरुण सदस्यांची संस्था आहे. या सदस्यांचे उद्दीष्ट आहे  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्य, सेवा, फेलोशिप, समाजकार्य आणि सत्कार्यास  प्रोत्साहन देणे.

  प्रा.एस.बी. मजूमदार, अतुल चोरडिया आणि सौरभ गाडगीळ यांना जागतिक स्तरावरील मानदंड निश्चित करण्याच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल नुकतेच सन्मानित करण्यात आले होते . यानंतर आज राऊंड टेबल इंडिया -चॅप्टर १७७ ने जिल्हा परिषद पुणे चे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचा सन्मान केला. यावेळी आरटीआय-पीएसआरटी -१७७चे अध्यक्ष रिषु बावेजा यांच्यासह राऊंड टेबल इंडियाचे सदस्य कीर्ती रुहिया आणि ललित पिट्टी  उपस्थित होते.

यावेळी बोलताना आरटीआय-पीएसआरटी -११७७ चे अध्यक्ष  रिषु बावेजा म्हणाले, “राउंड टेबल इंडिया बर्‍याच काळापासून वंचित मुलांसाठी शिक्षण देण्याचे काम करत आहे. हे उद्दीष्ट साकार झाल्यापासून ‘सर्वांसाठी शिक्षण’ चे स्वप्न साकार करण्यासाठी आरटीआयत अनेक कार्य केली आहेत. “सर्वांसाठी शिक्षण’ देण्याचे आमचे ध्येय लक्षात घेऊन आम्ही वैयक्तिकरित्या अश्या बर्याच जणांना भेटलो  जी अश्याच ध्येयाने प्रेरित आहेत ”

आयुष प्रसाद आय.ए.एस. अधिकारी आणि पुणे जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी, ज्यांना पुणे जिल्हाधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती, ते जिल्ह्यातील शिक्षणाची पातळी सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आयुष प्रसाद यांनी आपल्या ‘डिकोड्स’ उपक्रमातून हजारो शेतकर्यांना मदत करण्या द्वारे आपले कौशल्य यापूर्वीच दर्शविले आहे. आयुष प्रसाद यांनी संशोधन अभियंता म्हणून आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील गरीब ग्रामीण स्त्रियांबरोबर काम केल्यावर त्यांचा व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतला.
आयुष प्रसाद यांनी समाजाची सद्य परिस्थिती सुधारण्यासाठी असंख्य योगदान दिले आहे आणि आम्ही आशा करतो की त्यांनी भविष्यातही असेच केले पाहिजे.  

Leave a Reply

%d bloggers like this: