Saturday, June 20, 2026
PUNE

‘पीसीईटी’ आणि ‘टीटीए’ यांच्यात सामंजस्य करार

पुणे : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशन पुणे (टीटीए) यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला. उद्योग आणि शिक्षण संस्थांमधील अंतर दूर करून त्यांच्यातील संवाद वाढविण्यासाठी हा करार उपयुक्त ठरणार आहे. या करारांतर्गत इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन सेल (आयआयईसी) स्थापन करण्यात आला आहे. 
‘पीसीईटी’च्या नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, तळेगाव येथील (एनएमआयईटी) महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ललितकुमार वाधवा आणि टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर असोसिएशनचे अध्यक्ष यशवंत घारपुरे यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. प्रसंगी ‘टीटीए’चे सचिव विलास रबडे, अनिल चैतन्य, ‘आयआयईसी’चे समन्वयक आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. संजय सांगे, प्रा. डॉ. विलास देवतारे, प्रा. डॉ. प्रणव चरखा, सागर जोशी, सुषमा भोसले, राहुल पाटील व अनिल चैतन्य उपस्थित होते.राजेश सर्वज्ञ व विलास रबडे यांनी हा करार घडवून आणण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. 
“या दोन्ही संस्थांमध्ये झालेला सामंजस्य करार ही एक संधी आहे. ‘टीटीए’चा हा तिसरा सामंजस्य करार असून, यापूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसीपीपीयू) रिसर्च पार्क फाउंडेशन आणि मॉडर्न कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांच्यासोबत हे करार झाले आहेत. संशोधनांना व्यवसायात रूपांतरित करण्याची देशाला गरज असून, त्यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्थांतील संवाद वाढणे आवश्यक आहे. मॉडर्न कॉलेजबरोबर इलेक्ट्रिकल व्हेइकलवर संशोधन व तीनचाकी विद्युत वाहनासाठी किट निर्मितीचे काम सुरु आहे. तर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा उद्योगांशी संवाद साधून तेथील संशोधन व्यवसायाच्या रूपात समाजापर्यंत पोहोचवण्याचा, तसेच विद्यार्थ्यांना केवळ नोकरी साठी तयार न करता त्यांना उद्योजक बनविण्याचा आमचा निर्धार आहे.” 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading