fbpx
Friday, April 19, 2024
ENTERTAINMENT

रूपा दिवेतिया म्हणतात, “57 व्या वर्षी अॅक्शन प्रसंग साकारण्यास मी उत्सुक बनले आहे!”

गेल्या 27 वर्षांत ‘झी टीव्ही’ वाहिनीने अनेक यशस्वी मालिकांचे प्रसारण केले असून नावीन्यपूर्ण आणि अभूतपूर्व विषयांवरील मालिका सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. आता या वाहिनीवर आणखी एक नावीन्यपूर्ण मालिका प्रसारित होणार असून ती प्रेक्षकांना फॅण्टसीच्या विश्वात घेऊन जाणार आहे. या वाहिनीने पूर्वी प्रसारित केलेल्या ‘ब्रह्मराक्षस’ या अतिशय लोकप्रिय आणि यशस्वी मालिकेचीच ही दुसरी आवृत्ती आहे. बालाजी टेलिफिल्म्सची निर्मिती असलेल्या या मालिकेत टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्री निक्की शर्मा आणि पर्ल व्ही. पुरी हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणार आहेत. त्यांच्या जोडीला टीव्हीवरील आणखी एक नामवंत अभिनेत्री रूपा दिवेतिया या आपल्या एका आगळ्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्का देण्यास सिध्द झाल्या आहेत.

आजपर्यंत टीव्ही मालिकांमधून अनेक सकारात्मक आणि खलनायिकेच्या व्यक्तिरेखा साकारलेल्या रूपा दिवेतिया आता तब्बल 15 वर्षांनी एका अमानवी शक्तीच्या नकारात्मक भूमिकेत पाहायला मिळतील. आता 57 वर्षांच्या असलेल्या या अभिनेत्री ही नवी भूमिका साकारण्याचे आव्हान स्वीकारण्यास उत्सुक बनल्या आहेत. मालिकेत त्यांचा पती ज्या तंत्र-मंत्राचा उद्योग करतो, त्यात त्याला साथ देणार्‍्या गेहना या महिलेची भूमिका त्या रंगविणार आहेत. रूपा दिवेतिया म्हणाल्या, “बर्‍्याच वर्षांनी मी एका 70 वर्षीय महिलेची भूमिका साकारणार असून मी यात एका तांत्रिकाची पत्नी बनले आहे. माझ्यातही काही वाईट छटा आहेत. शिवाय यात मी माझ्याच वयाचीही एक भूमिका एकाच वेळी रंगविणार असून या दोन्ही भूमिका मी आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा अगदी भिन्न आहेत. सुमारे 15 वर्षांपूर्वी मी अमानवी शक्ती असलेली एक व्यक्तिरेखा रंगविली होती आणि आता पुन्हा तसाच अनुभव घेण्याच्या कल्पनेने मी थरारून गेले आहे. शिवाय ही भूमिका माझ्यासाठी एक नवं आव्हान घेऊन येणार आहे. ही जरी नकारात्मक भूमिका असली, तरी ती एका विक्षिप्त व्यक्तीची आहे.”

कोणतीही भूमिका साकारताना जे आव्हान येईल, ते स्वीकारण्याच्या तयारीने त्याचा स्वीकार करणार्‍्या रूपा दिवेतिया यांनी या भूमिकेसाठी काही अॅक्शन प्रसंग करण्याचीही तयारी केली आहे. त्यात त्यांचे वय आडवे येणार नाही. यासंदर्भात रूपा दिवेतिया म्हणाल्या, “मी यापूर्वीही काही अॅक्शन प्रसंग साकारले होते. ती एका महिला माफिया गुंडाची भूमिका होती. पण तेव्हा मी 30 वर्षांची होते… आणि आता 57 (हसतात). इतक्या वर्षांनंतर, या वयात अॅक्शन प्रसंगांचं चित्रीकरण करायचं ही गोष्ट आव्हानात्मक असली, तरी उत्कंठावर्धकही आहे. यातील गेहनी ही जरी 70 वर्ष093Eची म्हातारी असली, तरी तिच्यात 17 वर्षांच्या मुलीसारखा उत्साह आणि ताकद असते. त्यामुळे मी सध्या माझी शारीरिक तंदुरुस्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत असून देवदयेने मी आजवर तशी नेहमीच निरोगी राहिले आहे. त्यामुळे मला हे प्रसंग साकारणं तसं सोपं जात आहे. शिवाय माझे कर्मचारी आमि टीमही मला मदत करतात. मला उडी मारून पळायला लावण्याचा प्रसंग असला, तरी त्यांनी माझी कुवत लक्षात घेऊन त्या प्रसंगात योग्य ते फेरफार केले.”

रूपा दिवेतिया आपल्या या भूमिकेतून खलनायिकेच्या प्रवृत्ती व्यक्त करण्यास सिध्द झाल्या असल्या, तरी ब्रह्मराक्षस-2 मालिकेत कालिंदी या या एका सामान्य मुलीची कथा सादर करण्यात आली आहे. या मालिकेचे कथानक सोनगढमध्ये घडते. या गावातील कालिंदी या सामान्य मुलीच्या नशिबात ब्रह्मराक्षसासारख्या दुष्ट आणि अमानवी ताकदीशी दोन हात करण्याचे लिहिले असते. लग्नाच्या दिवशी वधूला पळवून नेऊन सार्‍्या गावाला निराशेच्या अंध:कारात लोटण्याची या ब्रह्मराक्षसाची सवय असते. तीच त्याची ताकद असते. पण तिचा प्रियकर अंगद याच्यावर असलेले कालिंदीचे निरतिशय प्रेम हीच तिची खरी ताकद असते. या ब्रह्मराक्षसाच्या अमानवी आणि दुष्ट जगाचा मुकाबला करताना कालिंदी आपल्या गावातील लोकांचे जीवन सुरक्षित करण्याचा प्रयत्न करते.

कालिंदीची जीवनयात्रा जाणून घेण्यासाठी 22 नोव्हेंबरपासून शनिवार-रविवार रात्री 9.00 वाजता  पाहा ‘ब्रह्मराक्षस-2’ फक्त ‘झी टीव्ही’वर

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading