Breaking – अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बायडेन, डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव

वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ( U S election )डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडेन विजयी झाले असून त्यांनी विद्यमान राष्ट्रध्यक्ष व रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड यांच्या पराभव केला आहे. ‘द गार्डियन’ या इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. बायडन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी इलेक्टोरल मते मिळाली. बायडन यांना सात कोटींहून अधिक मते मिळाली.

जगातिक पतळीवरील महासत्ता असणा-या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे सा-या जगाचे लक्ष लागले होते. शनिवारी रात्री या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यात डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष होणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव केला आहे.

पेनसिल्व्हेनिया राज्यातली मतं बायडन यांच्यासाठी निर्णायक ठरली. पेनसिल्व्हेनियात बायडन यांना 20 इलेक्टोरॉल कॉलेज मतं मिळाली. यामुळं बायडन यांच्या मतांची संख्या 273 झाली.

बहुमतासाठी 270चा आकडा पार करणं आवश्यक असतं. हा आकडा पार केल्याने बायडन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे.

बायडन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी आफ्रो-अमेरिकन वंशाच्या कमला हॅरीस यांची निवड होणार आहे. कमला हॅरीस आता अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असतील.

दरम्यान, मतमोजणीवर आक्षेप घेऊन डोनाल्द ट्रम्प यांनी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे. अनेक दिवस सुरू असलेल्या मतमोजणीनंतर जो बायडन यांनी विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चितपट करत बाजी मारली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: