पुणे पदवीधर मतदारसंघातून मनोजकुमार गायकवाड यांना ‘संभाजी ब्रिगेड’ ची उमेदवारी
पुणे, दि. ५ – संभाजी ब्रिगेड हे १००% समाजकारण व १००% राजकारण ही भूमिका घेत शिव-फुले-शाहू-आंबेडकर या कृतिशील विचारांनी चालणारे पक्ष-संघटन आहे. पुणे-सोलापूर येथील तरुण उद्योजक इंजि. मनोज कुमार गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून संभाजी ब्रिगेड मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वात अनेक विद्यार्थी प्रश्न तसेच शिक्षक व शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलने झालीत. एका तरुण उद्योजकाला संधी देण्याच्या उद्दिष्टाने व बहुजन विचारधारा जनमानसात रुजविणे च्या दृष्टीने संभाजी ब्रिगेडचे उमेदवारी इंजि. मनोजकुमार गायकवाड यांना देण्यात आली आहे. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांनी दिली. पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर परिसरातील सर्व पदाधिकाऱ्यांनी ही विचारधारा रुजवण्यासाठी संभाजी ब्रिगेड ला सहकार्य करावे असे आवाहन अॕड. मनोज आखरे यांनी केले आहे.
