‘महिंद्रा’च्या ‘ऑल-न्यू थार’ने ओलांडला 20 हजार नोंदणीचा टप्पा, प्रतीक्षा कालावधीही सहा महिन्यांपेक्षा जास्त

मुंबई, –  महिंद्रा अॅंड महिंद्रा या कंपनीच्या नुकत्याच सादर झालेल्या ‘ऑल -न्यू थार’ या ‘एसयूव्ही’साठी नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची संख्या आता 20 हजारांपुढे गेली आहे. सादर झाल्यापासून एका महिन्याच्या कालावधीतच या गाडीला हा भरघोस प्रतिसाद मिळाला आहे. महिंद्रा अॅंड महिंद्रा ही कंपनी 19.4 अब्ज डॉलर्सची उलाढाल असलेल्या महिंद्रा समुहातील प्रमुख कंपनी आहे.

‘ऑल-न्यू थार’ ला मिळणारा हा प्रतिसाद पाहता, तिच्या काही प्रकारांसाठी 5 ते 7 महिन्यांपर्यंतचा प्रतीक्षा कालावधी ठेवावा लागत आहे. ‘हार्ड टॉप ऑटोमॅटिक’ व ‘मॅन्युअल’ (डिझेल व गॅसोलिन हे दोन्ही पर्याय) या गाडीच्या मॉडेल्सनी सर्वांच्याच अपेक्षा उंचावल्या आहेत.

‘ऑल न्यू थार’ ला यापुढेही असाच प्रचंड प्रतिसाद मिळेल, हे गृहीत धरून नाशिकमधील कारखान्यात सुरू असलेले उत्पादन व कच्च्या मालाचे पुरवठादार या दोन्ही पातळ्यांवर वाढ करण्याचे प्रयत्न कंपनीने चालविले आहेत. यातून वाढत्या मागणीला तोंड देता येईल आणि ग्राहकांसाठीचा प्रतीक्षा कालावधी कमी करता येईल, असे कंपनीचे नियोजन आहे. ‘थार # 1’ ही पहिलीवहिली गाडी ऑनलाईन लिलावात जिंकलेल्या आकाश मिंडा यांना गेल्या दि. 1 नोव्हेंबर रोजी ही गाडी सुपूर्द करण्यात आली. या आठवड्याअखेरीस 500 हून अधिक ‘ऑल-न्यू थार’ गाड्यांचे वितरण देशभरात करण्यात येणार आहे.

नोंदणीच्या या यशाबद्दल बोलताना ‘महिंद्रा अॅंड महिंद्रा’च्या ‘ऑटोमोटिव्ह डिव्हिजन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी वीजय नाकरा म्हणाले, ‘’ऑल-न्यू थार’ला मिळालेल्या या भरघोस प्रतिसादामुळे आम्ही आनंदीत झालो आहोत. आमच्या अपेक्षेपेक्षा व उत्पादन क्षमतेपेक्षा जास्त प्रतिसाद या गाडीला मिळाला, हे मान्य करायलाच हवे. त्यामुळेच ’ऑल-न्यू थार’ मिळविण्यासाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. आमच्या ग्राहकांचा संयम व त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास यांबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो.’’ 

नाकरा पुढे म्हणाले, ‘’दरमहा 2 हजार गाड्यांचे उत्पादन करण्याचे आमचे सुरुवातीचे नियोजन होते. आता येत्या जानेवारीपर्यंत ते 3 हजारावर नेण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे प्रतीक्षा कालावधी कमी होऊन तो सर्वसाधारण पातळीवर येईल.’’

कंपनीने ग्राहकांशी व्यक्तिगत पातळीवर संपर्क साधून गाडीच्या वितरणाच्या संभाव्य तारखा सांगण्यास सुरुवात केली आहे. प्रतीक्षा कालावधीतील प्रत्येक टप्प्यात ग्राहकांना ही वितरणाची अद्ययावत माहिती देण्याचे धोरण कंपनीने आखले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: