पारंपरिक आणि चुकीच्या रुढी परंपरांमधून बाहेर पडण्यासाठी शिक्षण हे शस्त्र – कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर

पुणे : शालेय अभ्यासक्रमात राजा राममोहन रॉय, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य एका पॅराग्राफ मध्ये असायचे. भारतीय समाजव्यवस्थेचे ते खºया अर्थाने हिरो होते. पांरपरिक आणि चुकीच्या रुढी परंपरेने ग्रासलेल्या समाजाला पुढे आणण्याचे काम त्यांनी केले. आज ही असे काम करण्याची गरज आहे. रुढीवादी परंपरा आणि चुकीच्या गोष्टीतून बाहेर येण्यासाठी शिक्षण हे एक शस्त्र आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमाळकर यांनी व्यक्त केले. 
पुणे प्रार्थना समाजाच्या १५० व्या स्थापनादिनानिमित्त करमाळकर यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या नवलमल फिरोदीया सभागृहात पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. यावेळी भूपाल पटवर्धन, संस्थेचे चिटणीस डॉ. दिलीप जोग,  सुषमा जोग उपस्थित होते.
महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनी संस्थेला डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार, मुक्तांगण मित्रच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर यांना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, तर अनुराधा सहस्त्रबुद्धे यांना डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार प्रदान करण्यात आला.  महाराष्ट्र वृक्षसंवर्धिनीच्या वतीने सुनील भिडे यांनी पुरस्कार स्विकारला. मानचिन्ह आणि रुपये २५ हजार रोख  असे पुरस्काराचे स्वरुप होते. 
डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार हा पर्यावरण संवर्धन, संरक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणाºया संस्थेस देण्यात येतो. समाजातील वेगवेगळ््या घटकांमधील सामंजस्यासाठी काम करणाºया व्यक्तीला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार देण्यात येतो. तर डेव्हिडा रॉबर्टस् पुरस्कार सामाजिक कार्य तसेच विशेष बालकांसाठी काम करणाºया संस्थेला किंवा व्यक्तीला देण्यात येतो. 
अनुराधा सहस्त्रबुद्धे म्हणाल्या, ज्ञानदेवीच्या माध्यमातून अनेक मुलांना शिक्षणाकडे आणि चांगल्या गोष्टींकडे वळविण्यात यश आले. मुलींची लहान वयातच लग्न होण्याचे प्रमाण कमी होऊन त्या चांगले शिक्षण घेऊ लागल्या. रस्त्यावरच्या मुलांना गंमतशाळा या बिनभिंतीच्या शाळेच्या माध्यमातून त्यांचे सकारात्मक गुण  दाखवून त्यांना संस्कारीत करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. बालकामगार, बालभिकारी, लैंगिक शोषण यासोबतच चाईल्ड पोर्नोग्राफी हा देखील काळजीचा विषय बनत असल्याचे त्यांनी सांगितले. 
मुक्ता पुणतांबेकर म्हणाल्या, हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण मुक्तांगण मित्रचा सन्मान आहे. एकत्रित काम केल्याने कोणत्याही कामात यश मिळते.  ३४ वर्षांपूर्वी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची सुरुवात झाली होती. येथे येणाºया लोकांना कायम घरच्यासारखे वातावरण मिळेल असाच प्रयत्न असतो. आताच्या काळात हा पुरस्कार मिळणे म्हणजे नवीन उर्जा मिळाल्यासारखे आहे. असे त्यांनी सांगिलते. सुनिल भिडे यांनी देखील मनोगत व्यक्त केले. दिलीप जोग यांनी प्रास्ताविक केले. सपना चौधरी -मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. धनश्री गणात्रा यांनी ईशस्तवन केले

Leave a Reply

%d bloggers like this: