भारतीय लष्कराचं नवं अॅप ; SAI सर्वाधिक सुरक्षित असल्याचा दावा

भारतीय सेनेने आता स्वत:चं मेसेजिंग अ‍ॅप तयार केलं आहे. भारतीय सेनेने या अ‍ॅपचं नाव सिक्योर अ‍ॅप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI – Secure Application for Internet) असं ठेवलं आहे. हे अ‍ॅप व्हॉईस कॉल, व्हिडिओ कॉलिंग आणि एंड-टू-एंड एनक्रिप्शनसह (End-To-End Encryption) आहे. हे अ‍ॅप सध्या अँड्रॉईड प्लॅटफॉर्मसाठीच तयार करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

संरक्षण मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशनचं हे मॉडेल व्हॉट्सअप, टेलीग्राम, SAMVAD आणि GIMS प्रमाणेच आहे. यात एंड-टू-एंड एनक्रिप्शन हा मेसेजिंग प्रोटोकॉलही वापरण्यात आला आहे. हे अ‍ॅप इन-हाउस सर्व्हर आणि कोडिंगद्वारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे अ‍ॅप अतिशय उत्तम असल्याचं बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या अ‍ॅपला CERT संबद्ध ऑडिटर आणि आर्मी सायबरग्रुपद्वारा तयार केलं आहे. बौद्धिक मालमत्ता अधिकार (Intellectual Property Rights-IPR) मिळवण्यासाठी, NIC होस्टिंग आणि iOS प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे.

संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हे एसएआय (SAI) अ‍ॅप संपूर्ण भारतात सेनेकडून वापरलं जाणार आहे. यामुळे भारतीय सेनेला सुरक्षित मेसेजिंगचा एक पर्याय मिळेल. हे अ‍ॅप्लिकेशन कर्नल साई शंकर यांनी डेव्हलप केलं आहे. त्यांच्या या कामगिरीबद्दल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अभिनंदन केलं असून त्यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: