IPL 2020 – राजस्थानचा पंजाबवर 7 विकेटने विजय

दुबई : आयपीएल 2020 च्या 50 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने किंग्स इलेवन पंजाबचा 7 विकेटने पराभव केला. राजस्थानचा सहावा विजय आहे. राजस्थान 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांची आशा अजून कायम आहे. पंजाबचा 13 व्या सामन्यात 7 वा पराभव झाला आहे. पण ते टॉप-4 मध्ये आहेत.

राजस्थानने टॉस जिंकत आधी पंजाबला बॅटींग करण्यासाठी आमंत्रण दिलं. केएल राहुलच्या टीमने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमवत 185 रन केले. राजस्थान मात्र 17.3 ओव्हरमध्येच 3 विकेट गमवत 186 रन केले. बेन स्टोक्सने 26 बॉलमध्ये 50 रन केले. संजू सॅमसनने 25 बॉलमध्ये 48 रन केले. रॉबिन उथप्पाने 30, स्टीव स्मिथने नाबाद 31 आणि जोस बटलरने नाबाद 22 रन केले. पंजाबचा पुढचा सामना चेन्नई सुपरकिंग्स आणि राजस्थानचा शेवटचा सामना कोलकाता नाईटरायडर्स विरुद्ध होणार आहे.

पंजाबकडून गेलने 99 रन केले. गेलने 6 फोर आणि 8 सिक्स मारले. केएल राहुलने 41 बॉलमध्ये 46 रन केले. राहुलने त्याच्या इनिंगमध्ये 3 फोर आणि 2 सिक्स मारले. राहुल आणि गेलने दुसऱ्या विकेटसाठी 120 रनची पार्टनरशिप केली.

Leave a Reply

%d bloggers like this: