Thursday, June 11, 2026
ENTERTAINMENT

‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिका बंद करण्याची मागणी

कोल्हापूर, दि. 30 – दख्खनचा राजा जोतिबाचं  महात्म्य दाखवणारी दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका वादात सापडली आहे. या मालिकेत चुकीची माहिती दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मालिकेच्या कथानकावर आक्षेप घेत मालिका बंद करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. मालिकेविरोधात निदर्शनंही करण्यात आली.

23 ऑक्टोबरपासून दख्खनचा राजा जोतिबा ही मालिका मराठी चॅनेलवर प्रक्षेपित झाली. आठवड्याभरातच ती वादात अडकली. मालिकेत चुकीचा इतिहास दाखवत भक्तांच्या भावना दुखावल्याचा आरोप करत ही मालिका तातडीने बंद करावी अशी मागणी करण्यात येत आहे. मालिकेविरोधात गुरव समाजातील पुजाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मंदिरासमोर निदर्शनं केली.महेश कोठारे निर्मित कोठारे प्रोडक्शनची ही मालिका आहे. मालिका सुरू होण्यापूर्वी ज्योतिबाची महती घराघरात पोहोचेल म्हणून ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला होता. दरम्यान  या मालिकेत चुकीची माहिती दाखवली जाणार नाही, पुजाऱ्याकडून योग्य ती माहिती घेतली जाईल, असा शब्द निर्माते महेश कोठारे यांनी दिली होता.  मात्र मालिका सुरू झाल्यानंतर ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे.  आता जी मालिका दाखवली जात आहे, त्यात अनेक चुकीच्या घटना आहेत, चुकीची माहिती सादर केली जाते आहे. असा आरोप गुरव समाजातील पुजाऱ्यांनी केला आहे.

या मालिकेत अनेक चुकीच्या गोष्टी दाखविल्या असून ही मालिका बंद करावी अशी मागणीही होऊ लागली आहे.  चुकीची माहिती दाखवून भावना दुखावल्याने आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.  सरपंच राधाताई बुणे यांना निवेदन दिलं आहे. सत्यकथा दाखवा अन्यथा मालिका बंद करा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.  कोठारे प्रोडक्शनवर कारवाई करा अशी मागणी गुरव समाजाने केली आहे. मालिकेची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading