पक्षघाताचा (स्ट्रोक) धोका वेळेत ओळखने महत्वाते – राजागोपाल श्रीनाथ


पुणे, दि. ३० – गेल्या दोन दशकांमध्ये पक्षघाताच्या रुग्णांच्या व्यवस्थापनामध्ये तसेच प्रोटोकॉल मध्ये बरेचसे बदल झालेले दिसून आले आहेत. “डिसेबिलिटी लिमिटेशन – रिहॅबिलिटेशन” याच्या उपचारांचा मुख्य आधार आहे आणि आंतरराष्ट्रीय धोरणामुळे आज पक्षघात पुर्णपणे बरा होऊ शकतो. अशी माहिती राजागोपाल श्रीनाथ (एमबीबीएस, एमडी (एमईडी), डीएनबी (एमईडी), डीएनबी (न्यूरो) असोसिएट प्रोफेसर मेडिसिन आणि न्यूरोलॉजी, एएफएमसी, पुणे) यांनीं दिली.
पक्षघाताचा झटका कधी सांगुन येत नाही संभावित लक्षणे समजुन घेणे, म्हणजेच चेहर् याचे होणारे बदल, वेगळे हावभाव, अशक्तपणा आणि बोलण्यात होणारा अडथळा यास वेळत ओळखुन रुग्णास वेळेत जवळच्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे.
तथापि, अशा परिस्थितीस ‘टाइम इज् ब्रेन’ म्हणता येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय सुविधांना लागलेला वेळ म्हणजे एसटीच्या चालू प्रक्रिये मध्ये काही ऊतींचे नुकसान होणे, म्हणुन वेळेत उपचार महत्वाचे ठरतात.

Leave a Reply

%d bloggers like this: