कार्ल्सबर्ग च्या औरंगाबाद कारखान्याला आरोग्य आणि सुरक्षितता कामगिरीबद्दल २०२० चा गोल्डन पीकॉक पुरस्कार

औरंगाबाद, दि. 30 –  बीअर उत्पादक कार्ल्सबर्ग इंडिया च्या औरंगाबाद येथील कारखान्याला कर्मचा-यांचे आरोग्य आणि सुरक्षितता या बाबतीतील उत्तम कामगिरीबद्दल २०२० चा गोल्डन पीकॉक पुरस्कार देण्यात आला आहे.  शीतपेये या विभागात कार्ल्सबर्ग ला हा पुरस्कार मिळाला.  

कार्ल्सबर्ग इंडिया आपल्या कर्मचा-यांचे आणि परिसरातील रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी वचनबद्ध आहे आणि कंपनीच्या कामामुळे ते धोक्यात येण्याची शक्यता कमी करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.  कर्मचा-यांना विस्तृत आणि परिपूर्ण माहिती देणे तसेच आरोग्य आणि सुरक्षितता जपण्यासाठी जगभरातील बीअर कारखान्यांमध्ये प्रस्थापित असलेली धोरणे आणि ISO 45001 सारख्या कार्यपद्धती, जीवरक्षक नियमावली, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, काही लक्षणे आढळल्यास त्यांचे तात्काळ निराकरण, सुरक्षिततेबद्दल कर्माचा-यांमध्ये जागृती करणे आणि या प्रक्रियेसाठी नेतृत्व करण्याची क्षमता असलेले कर्मचारी शोधून काढणे अशा काही कल्पनांचा वापर करून कंपनी शून्य अपघात वातावरण निर्माण करत आहे.     

२०२० चा गोल्डन पीकॉक पुरस्कार मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत कार्ल्सबर्ग इंडिया चे उपाध्यक्ष मुथुरामन रामनाथन म्हणाले, आमच्या कर्मचा-यांचे आणि परिसरातील रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता अबाधित राखणे हे आमच्या कार्यपद्धतीतील महत्त्वाचे तत्व आहे. हा पुरस्कार म्हणजे आमच्या प्रयत्नांना मिळालेली पावती आहे.  “शून्य अपघात वातावरणासाठी एकजूट” या आमच्या उपक्रमाद्वारे आम्ही सुरक्षितता हा आमच्या कार्यपद्धतीचा अविभाज्य घटक मानतो आणि सुरक्षित कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात उत्तम कामगिरी करणा-या कर्मचा-यांना उत्तेजन देतो. सध्याच्या कठीण परिस्थितीत असा पुरस्कार मिळाल्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली आहे आणि सुरक्षितता डावलून करावे इतके महत्वाचे कोणतेच काम नसते या आमच्या श्रद्धेला त्यामुळे पुष्टी मिळाली आहे. 

औरंगाबाद चा बीअर कारखाना ऑगस्ट २००८ मध्ये सुरु झाला आणि आज कार्ल्सबर्ग इंडिया चा भारतातील सर्वाधिक उत्पादन करणारा कारखाना आहे.  इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स ने हा  गोल्डन पीकॉक पुरस्कार १९९१ मध्ये सुरु केला. आज हा पुरस्कार म्हणजे सर्वोत्तम कामगिरीचे चिन्ह म्हणून भारतात आणि जगभरात ओळखले जाते.  या वर्षीच्या पुरस्कारांसाठी भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एम एन वेंकटाचलय्या यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीने काम केले. 

Leave a Reply

%d bloggers like this: