Friday, September 4, 2026
PUNE

बालसाहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा : ल. म. कडू

मसाप ऑनलाइन कार्यशाळेत नवलेखकांना  मार्गदर्शन

पुणे : बालकुमारांसाठी लेखन करताना शब्दांचा वापर जबाबदारीने करायला हवा. त्याचबरोबर बालसहित्यात भाषा आणि रेषांचा मिलाफ हवा. असे मत प्रसिद्ध चित्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक ल. म. कडू यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्यावतीने आयोजित ऑनलाईन  कार्यशाळेत नव लेखकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. ‘बालकुमारांसाठी लेखन’ हा कार्यशाळेचा विषय होता. ल. म. कडू आणि कवयित्री डॉ संगीता बर्वे यांनी सहभागीना मार्गदर्शन केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार यावेळी उपस्थित होते.

कडू म्हणाले, ‘मनोरंजन हाच बालसाहित्याचा मुख्य हेतू असला पाहिजे. सतत संस्काराचा आणि उपदेशाचाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासाठी लेखन करू नये. बहुतेक लेखन कुमारांसाठी केले जाते. शिशुगटालाही खेळणी ऐवजी पुस्तकात रमविले पाहिजे.’ 

डॉ. बर्वे म्हणाल्या, ‘बालकुमारांसाठी लिहिणाऱ्या लेखकांनी मुलांच्या नजरेतून जगाकडे पाहिले पाहिजे. मुलांच्या सुखदुःखाशी एकरूप झाले पाहिजे. शब्दांच्या खेळातून भाषेची गम्मत मुलांना समजली पाहिजे.’

प्रा. जोशी म्हणाले, ‘मुलांसाठी लेखन करणारे लेखक स्वतःचे बालपण डोळ्यासमोर ठेवून लेखन करतात दरम्यान काळाचे बरेच पाणी वाहून गेलेले असते, त्यामुळे मुलांना ते साहित्य आपलेसे वाटत नाही. आजच्या तंत्रस्नेही मुलांना भावसंपन्न बनविण्यासाठी कसदार साहित्य त्यांच्या हातात द्यायला हवे. पालक आणि शिक्षक वाचताना दिसले तरच मुले वाचणार आहेत. प्रकाश पायगुडे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading