राजीव रिषभला लागलेले सोशल मीडियाचे वेड कशाप्रकारे दूर करेल?

सोनी सबवरील मालिका ‘तेरा यार हूं मैं’आताच्या स्थितीशी जुडले जाता येईल असा आणखी एक विषय सादर करण्‍यास सज्‍ज आहे आणि तो विषय म्‍हणजे सोशल मीडियावरील व्‍हायरल व्हिडिओचे वेड. रिषभचे (अंश सिन्‍हा)त्‍याच्‍या ऑनलाइन उपस्थितीचे वेड अत्‍यंत टोकाला जाते, जेथे तो व्‍हायरल व्हिडिओ तयार करण्‍यासाठी त्‍याचे जीवन धोक्‍यात टाकतो. मालिका एक रोमांचक वळण घेणार आहे, अंशचे काळजीवाहू वडिल राजीव (सुदीप साहिर) त्‍यांच्‍या मुलाला वास्‍तविक ऑफलाइन संबंधांच्‍या महत्त्वाची जाणीव करून देण्‍यासाठी अनोख्या मार्गाचा प्रयत्‍न करतो.

दादाजीना(राजेंद्र चावलास्‍फूर्ती देण्‍यासाठी रिषभ व राजीव एक व्हिडिओ तयार करतात. राजीव दादाजीच्‍या भूमिकेत आणि रिषभ राजीवच्‍या भूमिकेत जुन्‍या आठवणींना उजाळा देणारा एक मजेशीर व्हिडिओ तयार करतात. पण दादाजींच्‍या चेह-यावर आनंद आणण्‍यासाठी बनवण्‍यात आलेला व्हिडिओ चुकून त्रिशलाच्‍या (निहारिका रॉय) सोशल मीडिया पेजवर अपलोड होतो. व्हिडिओ लवकरच व्‍हायरल होतो आणि रिषभ त्‍याची शाळा व समाजामध्‍ये सेलिब्रिटी बनतो. या नवीन मिळालेल्‍या लोकप्रि‍यतेमध्‍ये भारावून जात रिषभला सोशल मीडिया व्‍यासपीठांचे जणू वेडच लागते आणि तो आणखी एक व्‍हायरल व्हिडिओ तयार करण्‍याची इच्‍छा व्यक्त करतो. लोकप्रि‍य बनण्‍यासोबत व्‍हर्च्‍युअल विश्‍वामध्‍ये प्रत्‍येकाने लाइक करण्‍यासाठी रिषभ धाडसी व्हिडिओ रेकॉर्ड करण्‍याचे ठरवतो, ज्‍यामुळे त्‍याच्‍या जीवाला धोका निर्माण होतो. लोकप्रि‍यता व लाइक्‍ससाठी मुलाला इतके टोकाचे पाऊल उचलताना पाहून राजीव परिस्थिती स्‍वत:च्‍या हातामध्‍ये घेतो आणि त्‍याला मुलाला धडा शिकवण्‍याचे ठरवतो.

यावेळी राजीवची योजना काय आहे? रिषभला वास्‍तविक संबंधांचे महत्त्व समजेल का?

रिषभची भूमिका साकारणारा अंश सिन्‍हा म्‍हणाला,”सुरू असलेली कथा अत्‍यंत जुडले जाता येणारी आहे. यासाठी शूटिंग करताना खूप धमाल आली. मी मालिकेमधील माझे वडिल राजीवची भूमिका साकारली आणि पहिल्‍यांदाच मिशी लावली. मला सांगावेसे वाटते की, मिशी लावून अभिनय साकारणे अत्‍यंत आव्‍हानात्‍मक आहे. सुदीप यांनी देखील मला लुक योग्‍य असण्‍यामध्‍ये मदत केली आणि मला राजीवची भूमिका परिपूर्ण साकारण्‍यासंदर्भात सूचना दिल्‍या. मी आशा करतो की, प्रेक्षक हे पाहण्‍याचा आनंद घेतील. अनेक मजेशीर सीक्‍वेन्‍सेस असण्‍यासोबत एपिसोड्समध्‍ये रिषभ ऑनलाइन उपस्थिती निर्माण करण्‍याच्‍या इच्‍छेमध्‍ये वाहून जाताना देखील पाहायला मिळणार आहे. तो व्‍हायरल व्हिडिओ तयार करण्‍यासाठी कोणत्‍या टोकाला जाऊ शकतो, हे पाहणे रोमांचक असणार आहे.”

राजीवची भूमिका साकारणारा सुदीप साहिर म्‍हणाला,”मालिका ‘तेरा यार हूं मैं’मध्‍ये सर्वाधिक वैशिष्‍ट्यपूर्ण व संबंधित विषय पाहायला मिळणार आहे, तो म्‍हणजे सोशल मीडियावर व्‍हायरल व्हिडिओंची लोकप्रि‍यता आणि आपल्‍याला त्‍याचे कशाप्रकारे वेड लागू शकते. कथानकामध्‍ये या विषयाला हलक्‍या-फुलक्‍या विनोदासह उत्तमरित्‍या समाविष्‍ट करण्‍यात आले आहे. प्रेक्षकांना पुन्‍हा एकदा राजीव त्‍याच्‍या मुलाचे व्‍हायरल व्हिडिओ बनवण्‍याचे वेड दूर करण्‍यासाठी आणि त्‍याच्‍या कुटुंबासोबत ऑफलाइन संबंधाचे महत्त्व समजवण्‍यासाठी आणखी एक अद्वितीय योजना घेऊन येताना पाहायला मिळणार आहे. हास्‍य व भावनांनी युक्‍त हा अत्‍यंत सुरेख संदेश आहे. राजीव यावेळी त्‍याच्‍या मुलासाठी कोणता मार्ग स्‍वीकारेल? हे जाणण्‍यासाठी मालिका पाहत राहा.”

Leave a Reply

%d bloggers like this: