विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी परिपूर्ण अर्ज विहीत वेळेत समितीकडे सादर करावा – बार्टी

पुणे, दि. 30: शैक्षणिक वर्ष 2020-21 या शैक्षणिक वर्षात ज्या अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेवू इच्छिणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत त्यांचे अर्ज वैधता प्रमाणपत्र समितीकडे सादर केलेल नाहीत, त्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन अर्ज भरावा व मुळ कागदपत्रांसह संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणीकडे सादर करावे तसेच जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज विहीत वेळेत समितीकडे सादर करावे व ज्या प्रस्तावामध्ये समितीकडून अर्जदारास त्रुटी कळविण्यात आलेल्या आहेत त्या त्रुटींची पुर्तता अर्जदाराने संबंधित समितीकडे करावी, याबाबत काही तांत्रिक व इतर अडचणी आल्यास helpdesk@barti.in व टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002330444, तसेच 9404999453/9404999452 या हॉटसॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक तसेच राज्य जात पडताळणी समितीचे मुख्य समन्वयक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: