Colorफुल लवकरच बहरणार सोनेरी पडद्यावर

लॉकडाउन नंतर आता चित्रपट सृष्टी पुन्हा बहरू लागली आहे. हळू-हळू शूटिंगला नवनवीन कल्पनांना वेग येत आहे. अगदी फुलांसम अनेक नवीन विचार सोनेरी पडद्यावर बहरायला सज्ज होत आहेत. असच यंत्रा पिक्चर्स प्रकाशित प्रकाश कुंटे दिग्दर्शित colorफुल हा चित्रपट देखील नवे रंग घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
प्रकाश कुंटे यांनी मराठी सिने सृष्टीला या आधी ही कॉफी आणि बरंच काही, &जरा हटके, हंपी तसेच सायकल असे अनेक वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट दिले आहेत. त्यामुळे आता colorफुल नवीन काय रंग घेऊन येणार आहे हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे हे नक्की.
मराठी चित्रपट सृष्टीत या निमित्ताने एक नवीन निर्माती म्हणून मात्र या वेळेस नवीन नाव पाहायला मिळत आहे. या चित्रपटाची निर्माती मानसी करणार असून या आधी अनेक हिंदी डोक्यूमेंटरी, लघु चित्रपट निर्मितीची जबाबदारी तिने पार पाडली आहे. प्रयोगशील कलाकृतीची निर्माती म्हणून मानसीची ओळख आहे. हिंदी निर्माती असली तरी मराठी मध्ये अनेक वेगवेगळे विषय, विविध कथानक खुलवून मांडता येतात म्हणून तिने कलरफुल हा पहिलाच मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचे ठरवले. नावाप्रमाणे रंगीत असलेल्या या चित्रपटाची रंगीत जादू अनुभवायची असेल तर २०२१ ची वाट पहावी लागेल हे निश्चित.

Leave a Reply

%d bloggers like this: