IPL 2020 – पंजाबचा विजय, चौथ्या स्थानी झेप

दुबई – आयपीएलचा तेरावा हंगाम उत्तरोत्तर रंगत जात आहे. सोमवारी झालेल्या कोलकाता विरूद्ध पंजाबच्या सामन्यात पंजाबच्या संघाने 8 गडी राखून विजय मिळवला.

गिल-मॉर्गन जोडीची महत्त्वाची भागीदारी आणि लॉकी फर्ग्युसनने शेवटच्या षटकांमध्ये केलेली फटकेबाजी यांच्या बळावर कोलकाताच्या संघाने २० षटकांत केवळ १४९ धावांपर्यंतच मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबच्या संघाकडून मनदीप सिंग (६६*) आणि ख्रिस गेल (५१) यांनी दमदार अर्धशतकं ठोकली. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा हा सलग पाचवा तर स्पर्धेतील सहावा विजय ठरला. पंजाबने या विजयाच्या जोरावर चौथ्या स्थानी विराजमान होत स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या डावाची सुरूवात अतिशय खराब झाली. नितीश राणा पहिल्याच षटकात शून्यावर बाद झाला. त्यानंतर शमीने दुसऱ्याच षटकात राहुल त्रिपाठी आणि दिनेश कार्तिकला माघारी धाडलं. पण शुबमन गिल आणि कर्णधार मॉर्गन यांनी पलटवार करत दमदार ८० धावांची भागीदारी केली. मॉर्गनने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ४० धावा केल्या.

मॉर्गन बाद झाल्यावर पुन्हा कोलकाताच्या डावाला गळती लागली. पण शुबमन गिलने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने ४५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकार खेचत ५७ धावा केल्या. शेवटच्या काही षटकांमध्ये १३ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २१ धावा केल्या. त्यामुळे कोलकाताला १४९ धावांपर्यंत मजल मारता आली. मोहम्मद शमीने ३, जॉर्डन, बिश्नोईने २-२ तर मुरुगन अश्विन, मॅक्सवेलने प्रत्येकी १ बळी टिपला.

Leave a Reply

%d bloggers like this: