IPL 2020 – कोलकाता पोहचला टॉप ४ मध्ये

अबुधाबी – आयपीएलच्या १३ व्या सिझनमधील ४२ व्या सामन्यात शनिवारी कोलकाता नाइट रायडर्स ने बाजी मारली आहे. कोलकाता ने अबु धाबीत दिल्ली कपिटल्सला ५९ धावांनी हरवलं. १९५ धावांच्या लक्षापर्यंत पोहोचण्यासाठी २० ओव्हरमध्ये फक्त १३५/९ धावा करू शकली. कोलकाताच्या विजयाचा हिरो वरूण चक्रवर्ती ठरला. ज्याने आपल्या फिरकीने ४ ओव्हरमध्ये २० धावा देऊन ५ विकेट घेतल्या. पँट कमिंसने देखील तीन विकेट घेतल्या. 

कोलकाता नाइट रायडर्सकरता हा सहावा विजय होता. ११ सामन्यात १२ पॉईंट्स घेऊन KKR चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा चौथा पराजय आहे. ११ सामन्यात १४ पॉईंट्स मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. 

कमिंसने दिल्लीला सुरुवातीला दिले दोन झटके १९५ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीने ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर आपली विकेट गमावली. शून्यवर आऊट झालेल्या अजिंक्य रहाणेला पँट कमिंसने एलबीडब्लू केलं. रहाणेसोबत खेळायला आलेल्या शिखर धवनने देखील फक्त ६ धावा केल्या. त्याला देखील कमिंसने बोल्ड केलं.

कोलकाता नाइट रायडर्सचा विजय चर्चेत राहिला. कोलकाता नाइट रायडर्सकरता हा सहावा विजय होता. ११ सामन्यात १२ पॉईंट्स घेऊन KKR चौथ्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सचा चौथा पराजय आहे. ११ सामन्यात १४ पॉईंट्स मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: