विमल अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सची स्वाद ब्रँडसाठी देशांतर्गत आणि जागतिक बाजारपेठांमध्ये विस्ताराची योजना

‘मेक इन इंडिया’ उत्पादक आणि जागतिक बाजारपेठेसाठी लज्जतदार खाद्यपदार्थ व पेय पदार्थांचे निर्यातदार विमल अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सने आपल्या फ्लॅगशिप ब्रँड स्वादसाठी त्यांच्या पहिल्या टीव्हीसी मोहिमेचे अनावरण केले. कंपनीच्या वार्षिक वर्धापन दिनाच्या (१४ ऑक्टोबर) पूर्वसंध्येला आणि उत्सवपर्वाच्या तोंडावर अनावरण झालेली ही मन हेलावणारी चित्रफीत, अस्सल भारतीय स्वाद आणि मूल्ये असलेल्या फूड पॅकमध्ये सामावले आहे कौटुंबिक प्रेम आणि स्वावलंबनाचा स्वाद असा मुख्य संदेश अधोरेखित करणारी आहे. तीन दशकांहून अधिक काळापासून भारतीय खाद्यपदार्थांची लज्जत जागतिक ग्राहकांपर्यंत पोहचविणाऱ्या विमल अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सची विविध १५० हून अधिक उत्पादने ४५ पेक्षा अधिक देशांमध्ये वितरीत होत आहेत. ही नवीन मन उत्तेजित करणारी टीव्हीसी यूट्युबवर https://youtu.be/Kveee8NYRzQ उपलब्ध आहे.
सतत विकसित होत असलेला ब्रँड स्वाद हा ३० वर्षांपासून सुस्थापित असून, आता आक्रमकपणे स्थानिक बाजारपेठेला लक्ष्य करताना, किरकोळ-वितरणात विस्तार करीत आहे. आमरस आणि आंब्याच्या कापा, आंबा चटणी, एक्झॉटिक चटणी, पापड, लोणचे, गोड लोणचे, रेडी टू इट फूड, सॉसेस, कूकिंग पेस्ट, आमटी पेस्ट, फळांचे रस आणि अन्य अनेक उत्पादनांची प्रस्तुती स्वाद या नाममुद्रेअंतर्गत करण्यात आली आहे. विमल अ‍ॅग्रो ही ग्राहकोपयोगी पॅकबंद रूपात आमरसाच्या सर्वात मोठ्या निर्मात्यांपैकी एक आहे.
विमल अ‍ॅग्रोने अलिकडे विदेशी चायनीज चव व भारतीय चव यांचा मिलाफ असलेली जिव्हा तृप्त करणाऱ्या भारतीय-चीनी खाद्यपदार्थ श्रेणीचा एक उत्पादन संच प्रस्तुत केला आहे. या श्रेणीमध्ये रेड चिली, ग्रीन चिली, डार्क सोया, चिली व्हिनेगर आणि यांच्यासह त्यांनी नुकतेच मंच्युरियन पॅन फ्राय आणि शेजवान पॅन फ्राय अशी उत्पादने आणली आहेत. शिवाय विमल अ‍ॅग्रोने अस्सल भारतीय परंपरेतील चटण्या जसे लसूण चटणी, खजूव व चिंचेची चटणी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अशा उत्पादनांच्या प्रस्तुतीची योजना आखली आहे.
विमल अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सचे अध्यक्ष सुभाषचंद्र नेमानी म्हणाले, “आपला किनारा ओलांडून समुद्रापार गेलेले आणि आपल्या मायभूमीच्या प्रिय गोष्टींबाबत मनात उत्कंठा कायम असलेल्यांसाठी विमलचे उद्दिष्ट हे स्वाद – अस्सल भारतीय स्वाद – त्यांना प्रदान करण्याचे आहे. परदेशस्थांमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची लोकप्रियता वाढत आहे. चव आणि गुणवत्तेला ‘स्वाद’च्या समानार्थी बनवून आम्ही सतत वाढणारी आणि चोखंदळ मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या श्रेणी आणि उत्पादनांत निरंतर विस्तार सुरू ठेवू. आपल्या ग्राहकांच्या चव व अभिरूचीला समजून त्याची पूर्तता जागतिक दर्जाच्या आरोग्यदायी खाद्य उत्पादनांद्वारे करणे आणि ग्राहक सेवेत उत्कृष्टतेचे आणि त्यायोगे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांत बाजार-अग्रणी बनण्याचे आमचे ध्येय आहे.”
नवीन टीव्हीसीसंबंधी बोलताना, कंपनीतील तरुण तुर्क अर्थात विमल अ‍ॅग्रो प्रॉडक्ट्सचे संचालक श्री. चिराग नेमानी म्हणाले, “आम्हाला घर / कुटुंब / मित्रांपासून दूर असतानाचा अनुभवही, स्वादच्या रेडी-टू-इट भारतीय पक्वान्नांच्या आस्वादाने कसा आनंददायी बनविला जाऊ शकतो, हे आम्ही दर्शवू पाहात आहोत. या विशिष्ट सिने कलाकृतीतून आमचे सुंदर पॅकेजिंग, अत्यंत आगळावेगळा स्वाद आणि कोणाही तरुणाला घरच्या सारखे अन्न आणि चव तयार करता येईल इतकी वापरास सोयीस्करता यांचे उत्तम प्रदर्शन करण्यात आले आहे. या टीव्हीसीतील महत्त्वाचा संदेश हाच आमच्या हृदयाच्याही खूप जवळचा आहे आणि आमची ठाम धारणा आहे की ‘घरगुती’ अन्नाद्वारे प्रेम व्यक्त करणे, कृतज्ञता व्यक्त करणे आणि खऱ्याखुऱ्या भावना व्यक्त करणे हे नात्यांना बळकटी देणाऱ्या इतर कोणत्याही भेटवस्तूइतकेच प्रभावी ठरते! तसेच जगभरात साथीच्या रोगाचे थैमान सुरू असलेल्या २०२० सालाने आपल्या आसपास असणाऱ्या मित्रपरिवार आणि कुटुंबीयांच्या योगदानाला दाद देणे का आणि किती महत्त्वाचे आहे, याची उत्तम जाणीव आपल्याला करून दिली आहे. आमचे ग्राहक प्रेम, सुख आणि आनंद या मौल्यवान भावनांना स्वादच्या लज्जतीशी जोडताना जेव्हा दिसतात, तेव्हा ते आमच्यासाठी आशीर्वादासारखेच असते.”
आपल्या संस्थापक संचालक सुभाषचंद्र नेमानी, पियूष नेमानी, संदीप नेमानी आणि पुढच्या पिढीतील चिराग नेमानी यांचे मार्गदर्शन आणि व्यावसायिकांच्या संघाची साथ मिळून स्वाद ही नाममुद्रा इतक्या वर्षात वृद्धींगत होत आली आहे. अस्सल कच्चा मालाची खरेदी करून, बदलत्या अभिरुचीनुसार नवीन स्वाद आणि मागणीला ओळखून आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक पाककृती ही नवीन पदार्थ घडविला जात आहे याप्रमाणे हाताळण्याची ही मंडळी सातत्याने प्रयत्न करत असतात.
स्वादची ही टीव्हीसी ओनिमा कश्यप यांच्याद्वारे अभिनीत आणि आघाडीचे सृजनशील दिग्दर्शक रूप नाईक यांनी तयार केली आहे. यात तरुणी घरापासून कसा दूर आहे हे दर्शविताना, तिला तिच्या आईवडील व भावंडांची आठवण बेचैन करीत असल्याचे दाखविले आहे. पण तरीही ती आंब्याची लस्सी झटपट स्वत: तयार करते आणि गमंत म्हणजे घरी तिच्या आईने जशी बनविली असती अगदी तशीच ती बनवू शकते, हा समाधानाचा क्षणही ती अनुभवते!

Leave a Reply

%d bloggers like this: