Thursday, June 11, 2026
ENTERTAINMENT

सफाई कर्मचा-यांच्या ‘दैवी’ कर्माला अभिनेत्री तेजस्विनी पंडितचं नवरात्री स्पेशल Illustration फोटोव्दारे दडवंत !!

आपल्या नवरात्री स्पेशल फोटोशूटमधून दरवर्षी अभिनेत्री तेजस्विनी पंडित काही ना काही सामाजिक संदेश देत असते. यंदा ती कोरोनायोध्द्यांना आपल्या फोटो Illustration मधून ट्रिब्यूट देत आहे. तेजस्विनी पंडितने नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टरांना आणि दूस-या दिवशी पोलिसांना आदरांजली वाहिल्यावर नवरात्रीच्या तिस-या दिवशी तिने समस्त सफाई कर्मचा-यांना आदरांजली वाहिली आहे.

हातात झाडू घेऊन रस्त्यावर उभी ठाकेलेली रणरागिणी आपल्या फोटोमधून तेजस्विनीने साकारलीय. तेजस्विनी पंडित तिस-या दिवशीच्या फोटोशूटविषयी सांगते, “दुर्गामातेने आपल्या शक्तीशाली त्रिशुळाने असुराचा वध केला होता. कोरोनारूपी असूराला पळवून लावायचे असेल, तर स्वच्छता आणि सॅनिटायझेशन महत्वाचेच ना.. कोरोना काळात स्वच्छता कर्मचा-यांच्या हातातल्या मोठ्या झाडुने ही त्रिशुळाचेच तर काम केले होते. त्यांच्यातल्या त्या दैवी कर्मांमूळेच तर आपण प्रत्येक गल्ली-बोळात, गावात, पाड्यात, शहरात स्वच्छता पाहू शकतोय.”

तेजस्विनी पंडित पूढे म्हणते, “आपण लहानपणापासून ऐकलंय, जिथे स्वच्छता असेल. तिथेच लक्ष्मीचा वास असतो. आणि वर्षाचे 365 दिवस दारोदारी स्वच्छता करण्याचं काम हे सफाई कर्मचारी करतात. त्यांच्यातल्या दैवीरूपाला माझे ह्या फोटोशूटव्दारे नमन.”

अभिनेत्री तेजस्विनी पंडितच्या चाहत्यांना तिच्या दरवर्षाच्या ह्या कल्पक फोटोशूटची उत्सुकता असते. आणि सध्या कोरोनायोध्द्यांना ती वाहत असलेली आदरांजली रसिकांच्या खूपच पसंतीस पडत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading