भाजपचा राजीनामा दिलेला नाही – एकनाथ खडसे

मुंबई, दि. 18 –  नाराज असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी रविवारी पक्षाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने राज्यात खळबळ उडाली होती. खडसे हे लवकरत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं त्यांच्या समर्थकांनी या आधीच सांगितलं होतं. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. यावर आता खुद्द एकनाथ खडसे यांनी खुलासा केला आहे. आपण भाजपचा राजीनामा दिलेला नाही असं त्यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

खडसे यांनी राजीनामा दिला असल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं होतं. मात्र खडसे यांच्याकडून अधिकृतपणे त्याबाबत सांगितलं जात नव्हते. मात्र सायंकाळी खडसे यांनी खुलासा करत आपली भूमिका स्पष्ट केली.

तर एकनाथ खडसे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजप सदस्यत्त्वाचा राजीनामा पाठवला असून ते येत्या गुरुवारी (22 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका संकेतस्थळाने प्रसिद्ध केली होती.

या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, नाथाभाऊंनी पक्षाचा राजीनामा दिला नाही. नाथाभाऊ पक्षाचा राजीनामा देणार नाहीत. असं करुन ते स्वत: चं नुकसान करुन घेणार नाहीत, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: