कोरोना – राज्यात आज 7 हजार नवीन रुग्ण तर 15 हजार 656 कोरोनामुक्त

मुंबई, दि. 12 – गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये 15 हजाराच्या वर संक्रमित रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आज याबाबत एक दिलासादायक बाब समोर येत आहे. राज्यात आज 7,089 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 15,656 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण 12,81,896 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 2,12,439 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

महत्वाचे म्हणजे सरकार व जनतेच्या प्रयत्नांमुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.49% झाले आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 76,9,906 नमुन्यांपैकी 15,35,315 नमुने पॉझिटिव्ह (19.94 टक्के) आले आहेत. राज्यात 23,23,791 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 25,951 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 165 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे.

देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता केंद्राने 35 मार्चपासून देशात लॉकडाऊन जाहीर केले होते. महाराष्ट्रात गेले सहा महिने या रोगाने धामाकुल घातला आहे. या दरम्यान अनेक गोष्टी बंद ठेवण्यात आल्या होत्या. आता सरकारी व आरोग्य यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून कोरोना विषाणू संक्रमितांची संख्या घटवली आहे. अजूनही महाराष्ट्रामध्ये लॉक डाऊन सुरु आहे मात्र रुग्णांची संख्या 4 अंकांवर येणे ही मोठी दिलासादायक बाब आहे.

दरम्यान, राज्याची राजधानी मुंबईमध्ये आज 1,620 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण संक्रमितांची संख्या 2,31,070 वर गेली आहे. सध्या मुंबईमध्ये 22,693 संक्रीय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Pune#PMC#Corona#Update

  • दिवसभरात ३५१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात ९५० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात २५ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ८५६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १५४५८१.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२२८५.
  • एकूण मृत्यू -३८४४.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १३८४५२.
  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १९२०.

Leave a Reply

%d bloggers like this: