Thursday, June 11, 2026
SportsTOP NEWS

IPL 2020 – आरसीबीने केला कोलकाताचा 82 धावांनी पराभव


शारजाह, दि. 12 – रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात इंडियन प्रीमियर लीग 13व्या सत्रातील 28 वा सामना शारजाह येथे खेळला गेला. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करत आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 194 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात केकेआरने लोटांगण घातलं आणि 82 धावांनी सर्वात मोठा पराभव पत्करला. आरसीबीने दिलेल्या धावांच्या प्रत्युत्तरात केकेआरला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 112 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरसाठी शुभमन गिलने सर्वाधिक 34 धावांचा डाव खेळला, आंद्रे रसेल राहुल त्रिपाठी यांनी प्रत्येकी 16 धावा केल्या. अन्य एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकला नाही. या विजयसह आरसीबीने 7 सामन्यात 10 गुणांसह गुणतालिकेत तिसरे स्थान मिळवले, तर केकेआरची चौथ्या स्थानी घसरण झाली.

लक्ष्याचा पाठलाग करताना टॉम बंटन कोलकाताकडून शुभमनसह सलामीला आला. सैनीने बंटनला 8 धावांवर बोल्ड केले. नितीश राणाका अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने क्लीन बोल्ड करत परत पाठवले. कोलकाताला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा सेट फलंदाज शुभमन 34 धावा काढून बाद झाला. उदानाच्या थ्रोवर विकेटकीपर डिव्हिलियर्सने त्याला धावबाद केले. मागील सामन्यात तुफान अर्धशतक झळकावणारा कर्णधार दिनेश कार्तिक चहलच्या चेंडूवर अवघी 1 धावा करून बोल्ड झाला. यानंतर इयन मॉर्गनला सुंदाराने आपल्या फिरकीत अडकवले आणि उदानाकडे झेलबाद केले. जीवनदान मिळवल्यानंतर काही मोठे शॉट्स मारल्यानंतर आंद्रे रसेल 10 धाव करून माघारी परतला. पॅट कमिन्सने 1 धाव केली. त्यानंतर मोहम्मद सिराजने राहुल त्रिपाठीला मॉरिसकडे झेलबाद केले. वॉशिंग्टन सुंदर आणि क्रिस मॉरिसने प्रत्येकी 2 तर नवदीप सैनी, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल आणि इसुरु उडानाने प्रत्येकी 1 गडी बाद केला.

यापूर्वी विराटच्या नाबाद 33 आणि डिव्हिलिअर्सच्या नाबाद 73 धावांच्या जोरावर आरसीबीने शारजाह येथे आव्हानात्मक धावसंख्या उभारली. आरसीबीच्या सलामीवीर आरोन फिंच आणि देवदत्त पद्धिकल (32) यांनी पहिल्याच चेंडूपासून वेगवान धावा करण्यास सुरवात केली. फिंच 47 आणिदेवदत्तने32 धावांचे योगदान दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading