IPL 2020 – मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 5 विकेटने एकतर्फी विजय

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स ( यांच्यात गुणतालिकेतील पहिल्या स्थानासाठी संघर्षात रोहित शर्माच्या एमआयने बाजी मारली. श्रेयस अय्यरच्या दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 162 धावा करून मुंबईसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात सलग तीन विजयानंतर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा विजयीरथ रोखला आणि दिल्लीविरुद्ध 5 विकेटने एकतर्फी विजय मिळवला. या विजयसह मुंबई इंडियन्सने आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थान गाठले आणि कॅपिटल्सची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. मुंबईसाठी क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादवयांनी अर्धशतकी डाव खेळला. डी कॉक आणि सूर्यकुमारने प्रत्येकी 53 धावा केल्या. ईशान किशनने 28 धावा केल्या. कृणाल पांड्या आणि किरोन पोलार्ड 10 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, कॅपिटल्ससाठी कगिसो रबाडा 2, आर अश्विन, अक्षर पटेल आणि मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दिल्लीविरुद्ध 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई संघाला कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. अक्षर पटेलने 5 धावांवर त्याला रबाडाकडे झेलबाद केले. सलामीवीर डी कॉकने मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत 34 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं. या स्पर्धेतील हे त्याचं दुसरं अर्धशतक ठरलं. अर्धशतक झळकावल्यावर डी कॉक लगेच झेलबाद झाला. त्याने 36 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. डी कॉकपाठोपाठ सूर्यकुमारने देखील फटकेबाजी करत 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. पण अर्धशतकानंतर सूर्यकुमारही लगेचच माघारी परतला. त्याने 32 चेंडूत 53 धावा करत 6 चौकार आणि 1 षटकार ठोकला. सूर्यकुमारनंतर फलंदाजीसाठी आलेला ‘बर्थ डे बॉय’ हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही आणि स्टोइनिसने त्याला कॅरीकडे झेलबाद केले.

यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने शिखर धवनच्या अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 162 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईच्या भेदक माऱ्यासमोर कॅपिटल्सची सुरूवात खराब झाली. एकीकडे दिल्ली निरंतराने विकेट गमावत राहिले तर धवनने दुसऱ्या बाजूने टिकून खेळ केला आणि नाबाद 69 धावा करून परतला.

Leave a Reply

%d bloggers like this: