कोरोना – राज्यात आज १० हजार ७९२ नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेटही वाढला

पुण्यात ६३० नवीन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यात आज १० हजार ७९२ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून १० हजार ४६१ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.आजच्या आकडेवारीवरून दिलासा मिळत असून राज्यातील रिकव्हरी रेट ८२.८६ टक्क्यांवर पोहोचला आहे.

राज्यात आज १० हजार ७९२ इतक्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळं राज्यातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख २८ हजार २२६ इतकी झाली आहे. तर, आज ३०९ जणांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं एकूण मृतांचा आकडा ४० हजार ३४९ इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७६,४३,५८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,२८,२२६ (१९.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,१०,७८३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २४,७२६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुणे कोरोना अपडेट ११ ऑक्टोबर – रविवार
…….

  • दिवसभरात ६३० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १०१० रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ४० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ८५८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १५४२३०.
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १२८९८.
  • एकूण मृत्यू -३८३०.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १३७५०२.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४२६९.

Leave a Reply

%d bloggers like this: