IPL 2020- दिल्लीचा राजस्थानवर 46 धावांनी विजय

शारजाह – आयपीएलच्या 23 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने राजस्थान रॉयल्सचा 46 धावांनी पराभव केला. सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. त्याचबरोबर राजस्थानने संघात दोन बदल केले होते. अंकित राजपूत आणि टॉम कुर्रेनच्या जागी अँड्र्यू टाय आणि वरुण अॅरोनचा समावेश करण्यात आला होता.

प्रथम फलंदाजीस आलेल्या दिल्ली कॅपिटलने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 184 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सपुढे 185 धावांचे लक्ष्य होते. दिल्लीकडून शिमरोन हेटमेयर सर्वाधिक 45 धावा केल्या. राजस्थान रॉयल्स संघ 138 धावांवर ऑलआऊट झाला. दिल्लीच्या रबाडाने तीन विकेट घेतले.

दिल्ली कॅपिल्सने या मोसमातील आपला पाचवा विजय नोंदविला आहे. राजस्थान रॉयल्सचा हा सलग चौथा पराभव आहे. दिल्लीने हा सामना 46 धावांनी जिंकला.

Leave a Reply

%d bloggers like this: