कोरोना – राज्यात 12 हजार नवे रुग्ण, 17 हजार रुग्णांना डिस्चार्ज, 302 जणांचा मृत्यू

पुण्यात 697 नवीन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांबाबत रोज दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे. आज 12 हजार 134 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 302 मृत पावले आहेत. तर गेल्या 24 तासात 17 हजार 324 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत.

आजच्या नव्या रुग्णांमुळे एकूण रुग्णांचा आकडा 15 लाख 06 हजार 018 वर पोहोचला आहे. यामध्ये 39 हजार 732 मृत झाले असून 12 लाख 29 हजार 339 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे आता 2 लाख 36 हजार 491 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुणे कोरोना अपडेट

  • दिवसभरात 697 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 970 रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात 23 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. 25 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 859 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 493 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 152897
  • पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 13736
  • एकूण मृत्यू – 3786

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- 135375

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4788

Leave a Reply

%d bloggers like this: