Thursday, June 11, 2026
PUNE

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ॲग्रो ॲम्बुलन्सचे लोकार्पण

पुणे,दि. ९ : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरती मातीपाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या ॲग्रो ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या सेवेत ही सेवा दाखल होत आहे.

विधानभवन प्रांगणात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरेकृषी व पशूसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकरजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading