fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

पुणे विभाग – 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे; विभागात कोरोना बाधित 4 लाख 57 हजार 775 रुग्ण

पुणे,दि.7 :- पुणे विभागातील 3 लाख 85 हजार 985 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 57 हजार 775 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 59 हजार 519 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 12 हजार 271 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.68 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.32 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा-
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 96 हजार 990 रुग्णांपैकी 2 लाख 56 हजार 485 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 33 हजार 691 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 814 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.29 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 86.36 टक्के आहे.

सातारा जिल्हा-
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 757 रुग्णांपैकी 31 हजार 229 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 255 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 273 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा-
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 424 रुग्णांपैकी 28 हजार 434 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 768 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 222 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा-
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 39 हजार 518 रुग्णांपैकी 32 हजार 544 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 5 हजार 514 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 460 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा-
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 46 हजार 86 रुग्णांपैकी 37 हजार 293 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 7 हजार 291 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 502 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ-
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 805 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 739, सातारा जिल्ह्यात 312, सोलापूर जिल्ह्यात 183, सांगली जिल्ह्यात 358 तर कोल्हापूर जिल्ह्यात 213 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 5 हजार 46 रुग्णांचा समावेश आहे. यात पुणे जिल्हा 2 हजार 880, सातारा 476, सोलापूर 322, सांगली 583 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 785 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण-
आजपर्यत विभागामध्ये एकुण 20 लाख 26 हजार 172 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 57 हजार 775 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

( टिप :- दि. 6 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading