fbpx
Monday, June 17, 2024
Business

एचसीसीबीकडून ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण सादर

पुणे,   – एचसीसीबी या भारताच्‍या आघाडीच्‍या एफएमसीजी कंपनीने कर्मचाऱ्यां साठी वर्क फ्रॉम होम धोरण सादर केले आहे. हे धोरण महामारीनंतरच्‍या काळादरम्‍यान देखील सुरू राहणार आहे, जेथे कर्मचारी प्रत्यक्ष कामाच्‍या ठिकाणी (कारखाना, विक्री इत्‍यादी) उपस्थित असण्‍याची गरज नसल्‍यास कायमस्‍वरूपी घरातून काम करण्‍याच्‍या पर्यायाची निवड करू शकतात. कंपनीच्‍या केअर व स्थिरता देण्‍याच्‍या मूलभूत तत्त्वाला पुढे घेऊन जात कर्मचा-यांची सुरक्षा, त्‍यांच्या भावनिक व शारीरिक आरोग्‍यासाठी असलेली धोरण तरतूद त्‍यांच्‍यासाठी घरामध्‍ये काम करण्‍यास अनुकूल वातावरणाची निर्मिती करते.

पहिली पायरी म्हणूनकंपनीने विनंतीनुसार कार्यालयातून बंगळुरु येथील मुख्यालयाबाहेर काम करणा-या पात्र कर्मचा-यांना कार्यालयीन पद्धतीने डिझाइन केलेल्या खुर्च्या वितरित करण्यास सुरुवात केली आहे. इतर शहरांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांसाठी वर्क चेअर खरेदी करण्याचा पर्याय आहे. अखंडित इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता जाणून घेत एचसीसीबी कर्मचा-यांना मासिक वायफाय खर्चासह वीज बॅक-अपसाठी यूपीएस स्थापित करण्‍याकरिता आर्थिक मदत करेल. कर्मचारी टेबलहेडफोन्सदिवेवेबकॅमबाह्य मायक्रोफोनअगदी कॉफी मग किंवा फुलदाणी देखील खरेदी करण्यासाठी आर्थिक साह्य मिळवू शकतात. शारीरिक आणि भावनिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कंपनीने १ टू १ हेल्‍प या संस्थेमार्फत टेलीमेडिसिन सुविधा व स्‍वास्‍थ्‍यासंदर्भात समुपदेशनाची तरतूद केली आहे. चॅटबॉटद्वारे व्यवस्थापित केलेले आणि सुलभपणे डाऊनलोड करता येणारे अॅप, कर्मचारी त्यांचे आरोग्य आणि स्‍वास्‍थ्‍याबद्दल कंपनीला माहिती देण्‍यासाठी वापरतील. कंपनीने आपल्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये पालक आणि सासू-सास-यांचा समावेश करण्याच्या तरतुदींसह कर्मचा-यांवर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तींसाठी टॉप-अप कव्हरमध्ये बदल केले आहेत.

हे धोरण एका क्रॉस-फंक्शनल टीमद्वारे डिझाइन केले गेले आहे, ज्यात संस्थेतील कर्मचा-यांचे मोठ्या प्रमाणावर इनपूटस् आहेत.

या धोरणाबाबत बोलताना एचसीसीबी येथील सीएचआरओ  इंद्रजीत सेनगुप्‍ता म्‍हणाले, ”सहानुभूती व स्थिरतेद्वारे नेतृत्वित हे धोरण कर्मचारी आणि त्‍यांच्‍यावर अवलंबून असलेल्‍या व्‍यक्‍तींना कामाचे ठिकाण न पाहता सुरक्षित असण्‍याची खात्री देते. या धोरणामागे एकसंधी अनुभव देण्‍याचा मनसुबा आहे, जे कंपनी, तसेच कर्मचा-यांसाठी लाभदायी ठरेल. या धोरणाचे अद्वितीय वैशिष्‍ट्य म्‍हणजे आमच्‍या सहका-यांनी या धोरणाची सह-निर्मिती केली आहे, ज्‍यांना त्‍यांच्‍या समस्‍या सखोलपणे माहित आहेत. स्थिती बदलत आहे आणि म्‍हणूनच आम्‍ही धोरणासाठी आवश्‍यक असू शकणारे कोणतेही बदल करण्‍यासाठी सुसज्‍ज व सक्षम आहोत.”

हे धोरण प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्‍ध करून देते आणि कर्मचाऱ्यां ना प्रभावीपणे काम करण्‍यास, उत्‍पादनक्षम राहण्‍यास, डिजिटल तणाव कमी करण्‍यास आणि काम करण्‍याची नवीन पद्धत अवलंबण्यास मदत करण्‍यासाठी साहित्‍याचा पुरवठा करते. कंपनीने लिंक्‍डइन लर्निंग व हार्वर्ड मॅनेज मेन्‍टॉर प्रशिक्षण कार्यक्रम देखील उपलब्‍ध करून दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading