fbpx
Monday, June 17, 2024
PUNE

उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी – संदिपान झोंबाडे

पिंपरी, दि.७ – पिंपरी चिंचवड शहर सकल मातंग समाजाच्या वतीने पिंपरीतील डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर उत्तर प्रदेश मधील बालापूर जिल्ह्यातील हथरस गावी दलित समाजातील मुलीवर सामुहिक बलात्कार करून क्रूर पद्धतीने हत्याकांड करण्यात आले, यांच्या निषेधार्थ धरणे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन मातंग समाजाचे जेष्ठ नेते संदिपान झोंबाडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आले.
” उत्तर प्रदेश मधील योगी बाबाचे सरकार त्वरित बरखास्त करून संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी व आरोपींना आणि त्यांचा बचाव करणार्या प्रशासकीय यंत्रणेच्या प्रमुखांना सह आरोपी करून फाशीचीच शिक्षा करावी. कारण गुन्हा करणार्या पेक्षा गुन्ह्यात मदत करून पुरावा नष्ट करणे हा सर्वांत मोठा गुन्हा आहे. सध्या देशामध्ये लोकशाहीची हत्या करून धर्मांध शक्ती या मनुवादी विचारांच्या विषारी प्रवृत्तीने मुंडके वर काढले आहे. तरी मा.राष्ट्रपती महोदयांनी या गंभीर व अतिसंवेदनशील प्रकरणावर एक मागासवर्गीय बांधव म्हणून त्वरीत कारवाई करावी. अशी मागणी झोंबाडे यांनी केली.

या आंदोलनात जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष दत्तु चव्हाण, युवक काँग्रेस चे उपाध्यक्ष विशाल कसबे, दलित विकास महासंघाचे अध्यक्ष मारूती दाखले, जेष्ठ नेते विजय दणके , माजी अध्यक्ष सुरेश जोगदंड, सुनिल भिसे, वाल्मिकी समाजाचे शहराध्यक्ष राजू परदेशी, पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग कार्याध्यक्ष हिरामण खवळे , मातंग एकता आंदोलन संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष मोहन वाघमारे, अण्णा कसबे, सचिन दुबळे, अक्षय दुनघव , मानवहित लोकशाही पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजू धुरंधरे,सुरेश सकट, दिपक लोखंडे, मछिंद्र वाघमारे, गणेश अडागळे, सविता आव्हाड, गणेश वैरागर, कष्टकरी कामगार पंचायत चे प्रल्हाद कांबळे, जे.डी.आल्हाट सर, बाजीराव नाईक, माणिक खंडागळे, नाथा शिंदे, सुभाष बनसोडे, अशोक लोखंडे, गणेश लोंढे, मनोज लांडगे, सुनिल मोरे, अक्षय झोंबाडे, अविनाश सोनपारखे, सोमनाथ कांबळे, बाबासाहेब बनसोडे, दिपक वाघ, गोपीनाथ कारके, सुरज कसबे, मिना रंधवे, आदी समाजातील कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading