देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६६ लाख ८५ हजारावर; २४ तासांत ६१ हजार २६७ नवे रुग्ण!

नवी दिल्ली – गेल्या काही महिन्यांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अतिशय झपाट्याने वाढत आहे. देशात दररोज 70 ते 80 हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होते. मात्र त्यातच आज काहीशी दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 24 तासांत देशात 61 हजार 267 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 884 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 66 लाख 85 हजार 083 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1 लाख 03 हजार 569 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 56 लाख 62 हजार 491 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 9 लाख 19 हजार 023 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

आयसीएमआरने दिलेल्या आकडेवारीनुसार, 5 ऑक्टोबरपर्यंत एकूण 8 कोटी 10 लाख 71 हजार 797 सॅंपल टेस्ट केले गेले आहेत. यातील 10 लाख 89 हजार टेस्टिंग काल करण्यात आली. सध्या देशात पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्के आहे. दरम्यान, जगभरातील एकूण संक्रमितांचा आकडा 3.56 कोटी झाला आहे. तर आतापर्यंत 2 कोटी 68 लाख 59 हजार 709 रुग्ण निरोगी झाले आहेत. मृतांचा आकडा 10.33 लाखपर्यंत पोहोचला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: