IPL 2020 – दिल्ली कॅपिटल्सचा बंगळरूवर 59 धावांनी विजय


इंडियन्स प्रीमियर लीगच्या तेराव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने रॉयल चॅलेंजर्स बंगळरूवर 59 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात बंगळरुच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाने बंगळरुच्या संघासमोर 197 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र, या लक्ष्याचा पाठलाग करताना बंगळरुच्या संघाला केवळ धावांपर्यंत मजल मारता आली. यामुळे या हंगामात चांगले प्रदर्शन करून दाखवणारा बंगळरूचा संघाला आजच्या सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे.

दिल्लीकडून खेळताना मार्कस स्टोईनिस 53 (26), पृथ्वी शॉ 42 (23) आणि रिषभ पंत 37 (25) यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर दिल्लीच्या संघाने 196 धावांचे डोंगर उभा केले. मात्र, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात 197 धावांचा पाठलाग करताना दुबईच्या मैदानावर बंगळरुच्या संघाची खराब सुरुवात झाली. सध्या फॉर्ममध्ये असलेले पडीकल, फिंच, डिव्हीलियर्स यांना या सामन्यात मोठी धावसंख्या उभारता आली नाही. मात्र, बंगळरुच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. त्याने बंगळरु संघाकडून सर्वाधिक 43 (39) धावा केल्या आहेत. ज्यात 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळरू विरुद्ध सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चौथा विजय मिळवून 8 गुण मिळवले पाहिजे. 8 गुणांसह दिल्लीच्या संघाने गुणातालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली आहे. तर, पराभवानंतर बंगळरूचा संघ तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: